कोणत्या समस्येत कशाच्या बीया आणि मसाल्यांचं करावं सेवन? डायटिशिअनने सांगितली नावे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:08 IST2024-12-14T13:08:24+5:302024-12-14T13:08:54+5:30
Healthy Tips : आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्यांमध्ये कोणते मसाले किंवा बीया फायदेशीर ठरतात. डायटिशिअन सिमरन भासिन यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

कोणत्या समस्येत कशाच्या बीया आणि मसाल्यांचं करावं सेवन? डायटिशिअनने सांगितली नावे!
Healthy Tips: किचनमध्ये आरोग्याचा खजिना असतो असं म्हटलं जातं. कारण किचनमध्ये उपचारांमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या अनेक गोष्टी असतात. ज्यात अनेक मसाले, बियांचा समावेश असतो. शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी या गोष्टींचा फायदा होतो. मात्र, लोकांना याबाबत फार माहिती नसते. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्यांमध्ये कोणते मसाले किंवा बीया फायदेशीर ठरतात. डायटिशिअन सिमरन भासिन यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हाय ब्लड शुगर
डायटिशिअननुसार, हाय ब्लड शुगर असलेले लोक मेथीच्या दाण्यांचं सेवन करू शकतात. मेथीचे दाणे भिजवून खाऊ शकता किंवा यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश करू शकता.
केसगळती
अनेकांचं आजकाल कमी वयातच केसगळतीची समस्या होऊन टक्कल पडतं. तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर तुम्ही चिया सीड्सचं सेवन करू शकता. चिया सीड्सच्या सेवनाने केसांसंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.
अॅसिडिटी
अॅसिडिटी दूर करण्यासाठी ओव्याचं सेवन करू शकता. ओवा पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतो. ओवा उकडून याचं पाणी सेवन करू शकता किंवा भाजूनही खाऊ शकता.
हाय इन्फ्लेमेशन
शरीरात हाय इन्फ्लेमेशन म्हणजे एखाद्या भागात सूज किंवा उष्णता वाढली असेल तर त्यासाठी कलौंजीच्या बियांचं सेवन करू शकता. कलौंजीच्या बियांमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात.
बद्धकोष्ठता
पोट बरोबर साफ होत नसेल तर त्याला बद्धकोष्ठता म्हटलं जातं. जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने हैराण असाल तर अळशीच्या बियांचं सेवन करू शकता. अळशीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असतं आणि याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर केली जाऊ शकते. तसेच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते.
फर्टिलिटी समस्या
डायटिशिअननुसार, ज्या लोकांना फर्टिलिटीसंबंधी समस्या होतात, त्यांच्यासाठी भोपळ्याच्या बीया फायदेशीर ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्व, व्हिटॅमिन आणि आवश्यक खनिज असतात.
थायरॉइड अंसतुलन
थायरॉइडने ग्रस्त लोकांसाठी धणे फायदेशीर ठरतात. धणे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकण्यासोबतच याच्या पाण्याचंही सेवन करू शकता. एक ग्लास पाण्यात रात्रभर धणे भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून सेवन करू शकता.
उष्णतेपासून वाचण्यासाठी
जर तुम्हाला जास्तच गरमी लागत असेल तर तुम्ही बेजिल सीड्सचं सेवन करू शकता. बेजिल सीड्स थंड असतात आणि याच्या सेवनाने शरीर आतून थंड राहतं.
मासिक पाळी येत नसेल तर...
जर तुमची मासिक पाळी मिस झाली असेल किंवा नियमितपणे येत नसेल तर गाजराच्या बियांचं सेवन केलं पाहिजे.