शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

चुकीच्या डाएटमुळे डिप्रेशनचा धोका! नवीन संशोधनात आल्या धक्कादायक बाबी समोर, करा 'हे' बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 15:37 IST

एखाद्या मानसिक धक्क्यामुळे, एखाद्यासोबत झालेल्या वादामुळे किंवा अनपेक्षित घटना घडल्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. याबाबत तुम्हाला माहित असेलच. पण या सगळ्यासोबतच तुमच्या आहाराचाही डिप्रेशनशी संबंध असल्याचं एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे.

डिप्रेशन (Depression) येण्याची बरीच कारणं असतात.  एखाद्या मानसिक धक्क्यामुळे, एखाद्यासोबत झालेल्या वादामुळे किंवा अनपेक्षित घटना घडल्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. याबाबत तुम्हाला माहित असेलच. पण या सगळ्यासोबतच तुमच्या आहाराचाही डिप्रेशनशी संबंध असल्याचं एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे.

पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन जर्नलमध्ये (Public Health Nutrition Journal) प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये याबाबत माहिती दिली आहे. या अभ्यासानुसार, जर तुमच्या डाएटमध्ये पोषक (Diet) तत्वांचा समावेश असेल, तर तुम्हाला डिप्रेशनसारखी समस्या होण्याची शक्यता कमी असते. तेच जर तुमच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटक नसतील, आणि तुमचा डाएटही अनहेल्दी असेल तर तुमचं डिप्रेशन वाढू शकतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुमच्या इम्युनिटीवर आणि शारिरीक वाढीवरही होतो. त्यामुळेच शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळण्यासाठी व्हिटॅमिन, मिनरल्स, अमिनो असिड्स आणि हेल्दी फॅट्सचा समावेश तुमच्या आहारात करणे गरजेचे आहे.

तुमचा मेंदू आणि गॅस्ट्रोइंटेस्टनल ट्रॅक्ट (Gastrointestinal tract) हे एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळेच तुमचा आहार आणि तुमचे इमोशन्स यांचा थेट संबंध असतो. गॅस्ट्रोइंटेस्टनल ट्रॅक्टला सेकंड ब्रेनही म्हटलं जातं. त्यामुळेच चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये बदल करणे आवश्यक आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यात चांगल्या मानसिक आरोग्यासाठी काय खावं आणि काय टाळावं याबाबत माहिती देण्यात आली आहे.

गोड आणि कॅफेनयुक्त पदार्थ टाळाचांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला कॅफेनयुक्त पेय (caffeine)  टाळायला हवीत. कॉफी आणि तत्सम पेयांमुळे आपल्या स्लीप पॅटर्नवर परिणाम होतो. तसेच, यामुळे डीहायड्रेशन होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळेच मूड डिसऑर्डर्स कमी करण्यासाठी कॅफेनचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच डिप्रेशन टाळण्यासाठी साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. चॉकलेट आणि इतर गोड पदार्थ खाल्ल्याने थोड्या वेळासाठी तुमचा मूड चांगला होऊ शकतो. मात्र, काही वेळानंतर पुन्हा चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो.

वेळच्यावेळी जेवाबऱ्याचदा आपण मूड चांगला नाही म्हणून जेवण टाळतो. मात्र, असं करणं तुमचं डिप्रेशन अधिक वाढवू शकतं. त्यामुळे जेवणाच्या वेळा पाळणं चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपल्या आहारात व्हिटॅमिन डी आणि ओमेगा ३ फॅटी असिड्स  याचा मोठ्या प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. हे घटक भरपूर प्रमाणात असलेला आहार घेतल्यामुळे तुम्हाला डिप्रेशन येण्याची शक्यताही कमी होईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारfoodअन्न