Deepika padukone doing pilates session in gym latest workout viral video of deepika to stay fit | VIDEO : फिटनेससाठी दीपिका पादुकोणचा पायलेट्स सेशन फंडा!
VIDEO : फिटनेससाठी दीपिका पादुकोणचा पायलेट्स सेशन फंडा!

दीपिका पादूकोण म्हणजे, फिल्म इंडस्ट्रिमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक. बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये सर्वात आधी दीपिकाचं नाव घेण्यात येतं. दीपिका जेवढी सुंदर आहे, तेवढीच ती फिट आणि फाइन आहे. ती नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्षं देते. आपली आकर्षक आणि सेक्सी फिगरसाठी ती तासन्तास जिममध्ये वर्कआउट करत असते. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी दीपिका अनेक चाहत्यांची फिटनेस आयकॉनही आहे. 

यास्मीन कराचीवालाने केला दीपिकाचा वर्कआउट व्हिडीओ 

अनेक बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच दीपिकाचाही आवडतं वर्कआउट पाइलेट्स (Pilates) आहे. दीपिका आणि बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची आवडती ट्रेनर यास्मीन कराचीवालाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दीपिकाचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला 'मंडे मोटिवेशनमध्ये दीपिका पादुकोण परफेक्शनने कॅडिलॅक स्वॅन करताना दिसून येत आहे. तुम्हीही या गोष्टीशी सहमत आहात का?' असं कॅप्शन दिलं आहे. 

या व्हिडीओमध्ये दीपिका पायलेट्स टेबलवर झोपलेली दिसत आहे. ती एकाचवेळी तीनदा कॅडिलॅक स्वॅन उत्तम प्रकारे करताना दिसत आहे. 

आपल्या पायलेट्स सेशन दरम्यान दीपिका एक व्हाइट स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक योगा पॅट्समध्ये दिसून आली. 33 वर्षांची हॉट आणि सेक्सी दीपिकाने आपल्या केसांचा बन बांधला आहे. यामध्ये दीपिका कोणत्याही मेकअपशिवाय फक्त वर्कआउटमुळेच ग्लोइंग आणि सुंदर दिसत आहे. 

दरम्यान, दीपिकाने काही दिवसांपूर्वीच आपला आगाम चित्रपट 'छपाक'चं शुटिंग पूर्ण केलं. तसेच दीपिका '83' या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत दीपिकाचा रिअल लाइफ पती रणवीर सिंह दिसणार आहे. म्हणजेच हे रिअल लाइफ कपल रिल लाइफ कपल म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Web Title: Deepika padukone doing pilates session in gym latest workout viral video of deepika to stay fit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.