खुशखबर! 'मेड इन इंडिया' लसीच्या दुसऱ्या अन् तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस DCGI ची मंजूरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:36 PM2020-08-03T17:36:07+5:302020-08-03T18:25:42+5:30

CoronaVirus News & Latest Updates : सीरम इंस्टिट्यूट कंपनी ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे.

DCDI grants approval to serum insititite of india to start phase two and three trial vaccine | खुशखबर! 'मेड इन इंडिया' लसीच्या दुसऱ्या अन् तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस DCGI ची मंजूरी

खुशखबर! 'मेड इन इंडिया' लसीच्या दुसऱ्या अन् तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस DCGI ची मंजूरी

googlenewsNext

कोरोना व्हायरसने भारतासह  जगभरातील देशांमध्ये कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. दरम्यान सीरम कंपनीला DCGI कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या वैद्यकिय चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. या लसीचे नाव COVISHIELD (कोव्हिशिल्ड) असणार आहे. सीरम इंस्टिट्यूट कंपनी ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांसोबत मिळून कोरोनावर लस तयार करणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकिय चाचणी सुरू करण्याआधी संबंधित माहिती केंद्रीय औषधी नियंत्रण संस्थेकडे  (CDSCO) कडे जमा करावी लागणार आहे. या माहितीचे मुल्यांकन (DSMB) च्या निरिक्षणाखाली करण्यात आलं आहे.  या चाचणीत सामिल असलेल्या व्यक्तीला चार आठवड्यांच्या आत दोन डोस दिले जाणार आहेत. म्हणजेच पहिला डोस दिल्यानंतर 29 व्या दिवशी दुसरा डोस दिला जाणार आहे. या माध्यमातून सुरक्षिततेच्यादृष्टीने कोरोनाशी सामना करण्यासाठी लस किती प्रभावी ठरते हे पाहण्यात येईल.

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांसोबत कोरोना लस तयार करण्याच्या कामात लागलेल्या सीरम इंस्टिट्यूटने एप्रिल महिन्यातच उघडपणे लस तयार करण्याचा दावा केला होता. आता कंपनीत प्रति मिनिट 500 डोस तयार होत आहेत. मात्र ही लस किती मोठ्या प्रमाणावर तयार होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीची आवश्यकता भासणार आहे. अशात पूनावाला भारत आणि इतर देश यांच्यात 50-50 पद्धतीनेही विभागणी करू शकतात.

एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या कोरोना लसीच्या चाचण्यांचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, एस्ट्राजेनेकाला ही लस तयार करण्यासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची साथ मिळाली आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे. ही कंपवी दरवर्षी 1.5 अब्ज लसींचे डोस तयार करते. यात, पोलिओपासून ते मीझल्सपर्यंतच्या लसींचा समावेश आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने याच भारतीय कंपनीला आपली कोरोना लस तयार करण्यासाठी निवडले आहे.  

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनीही यापुर्वी याबाबत स्पष्ट केले आहे. तसेच लसीच्या निर्मितीची घाई न करता त्याच्या गुणवत्तेवर अधिक भर देत असल्याचेही सांगितले. संस्थेने या लसीच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुक केली आहे. भारतासह विकसनशील देशांमध्ये परवडत असलेल्या किंमतीत ही लस उपलब्ध करून देण्याची त्यांची तयारी आहे. सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने जगभरात लसीच्या मानवी चाचण्यांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. त्यामुळे भारतातील चाचण्या यशस्वी झाल्यास कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे. 

चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा

Web Title: DCDI grants approval to serum insititite of india to start phase two and three trial vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.