डान्सने वाढते शारीरिक क्षमता, दूर होतात 'हे' आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 11:26 AM2018-11-14T11:26:05+5:302018-11-14T11:27:41+5:30

गणपती डान्स असो वा लग्नातला किंवा व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेला डान्स असो यातून किती आनंद मिळतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

Dance can enhances stamina says research | डान्सने वाढते शारीरिक क्षमता, दूर होतात 'हे' आजार!

डान्सने वाढते शारीरिक क्षमता, दूर होतात 'हे' आजार!

Next

गणपती डान्स असो वा लग्नातला किंवा व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेला डान्स असो यातून किती आनंद मिळतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. डान्सचे वेगवेगळे फायदे वेळोवेळी समोर आले आहेत. डान्सने केवळ फिटनेसच चांगली राहते असं नाही तर वेगवेगळ्या आजारांपासूनही आराम मिळतो. आतापर्यंत अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण आता यावर एका रिसर्चने शिक्कामोर्तब केलं आहे. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, डान्सने शारीरिक क्षमता वाढते, डान्सने स्ट्रेस दूर होतो, डान्समे मेंदूला आराम मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो.

काय सांगतो रिपोर्ट?

डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यॉर्कशायर डान्स आणि लीड्स विश्वविद्यालया व्दारे करण्यात आलेल्या रिसर्चमधून हे समोर आले की, जे लोक कोणत्या ना कोणत्या कलेशी जोडलेले असतात ते सहजपणे स्ट्रेस हाताळू शकतात. २ वर्षात पूर्ण झालेल्या या रिसर्चमध्ये १० ते २० अशा मुलांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना त्यांच्या घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. 

या रिसर्चमध्ये त्यांना आठवड्याभराच्या डान्स सेशनमध्ये सहभागी करुन घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना लेखी आणि मुलाखतीच्या माध्यमातून काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांमधून हे समोर आले की, डान्सच्या मदतीने आई-वडील, समाज आणि शिक्षकांप्रति त्यांच्या व्यवहारात सकारात्मकता आली.

त्रासलेल्या लोकांना फायदा

रिपोर्टनुसार, डान्स केवळ फिट राहण्यासाठीच फायदेशीर नाही तर याने व्यक्तीच्या संपूर्ण विकासातही फायदा होतो. याने निर्णय घेण्याची क्षमता आणि तणावाशी लढण्याची ताकद मिळते. 

डान्सची खासियत

- डान्सकडे एका थेरपीप्रमाणे पाहिले जाते. याने केवळ मेंदू अॅक्टिव राहतो असे नाही तर मेंदूच्या नसांही मोकळ्या होतात.  

- डान्स थेरपीचा रुटीनमध्ये समावेश केला तर हेल्दी राहण्यास मदत होईल आणि मूडही चांगला राहील. 

- डान्समुळे ऑस्टियोपोरोसिस (हाडे कमजोर होणे) आजार होण्याचा धोका कमी असते. 

- डान्समुळे हार्मोन्स कंट्रोल होतात आणि सोबतच हाडांमध्ये कॅल्शिअमचं योग्य प्रमाण कायम ठेवण्यास मदत करतो. 

- रोज डान्स केल्याने तुम्ही १५० ते ५०० कॅलरी बर्न करु शकता. 
 

Web Title: Dance can enhances stamina says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.