Daily dose of asprin is no longer recommended by doctors for older adult to prevent heart problems | हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला
हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला

अनेक वर्षांपासून अ‍ॅस्प्रिन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंध इतरही समस्या दूर ठेवण्यासाठी वृद्ध रूग्णांना दिली जात आहे. पण आता अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन द्रारे जारी करण्यात आलेल्या नव्या निर्देशांनुसार, डॉक्टरांना असे न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

न्यू यॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नव्या निर्देशांमध्ये सल्ला देण्यात आला आहे की, कमी पॉवर असलेली अ‍ॅस्प्रिन ७० वयवर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांना जे फिट आहेत किंवा ज्यांना इंटरनल ब्लीडिंगचा धोका आहे अशांना दिली जाऊ नये. 

हे दिशा-निर्देश लिहिणाऱ्या डॉक्टरांपैकी एक असलेले डॉक्टर एरन मायकोस यांच्यानुसार, 'या गाइडलाइन्स खासकरून त्या लोकांसाठी आहेत ज्या लोकांमध्ये हृदयरोग किंवा स्ट्रोकशी संबंधित काहीच संकेत दिसत नाहीत'. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की, ज्या रूग्णांना आधीच हृदयविकाराचा झटका पडला आहे किंवा स्टेंट लावण्यात आली आहे त्यांनी अ‍ॅस्प्रिन घेणे सुरूच ठेवले पाहिजे. 

हाय रिस्क रूग्णांना दिली जाऊ शकते अ‍ॅस्प्रिन

डॉक्टर अ‍ॅस्प्रिन डोज हाय रिस्क रूग्णांना प्रिस्क्राइब करू शकतात. खासकरून असा रूग्णांना जे त्यांचं कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास किंवा कमी करण्यास अडचण येते. पण यातही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, अ‍ॅस्प्रिनमुळे त्यांना इंटरनल ब्लीडिंगचा धोका असू नये.  

हृदयरोग दूर ठेवण्यासाठी सूचना

हृदयरोगांना दूर ठेवण्यासाठी गाइडलाइन्समध्ये लाइफस्टाइलमध्ये बदल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात हेल्दी वेट, स्मोकिंग न करणे, आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटे व्यायाम करणे तसेच भाज्या, फळं, नट्स, कडधान्य आणि मासे खाणे यांचा समावेश आहे. 

२०१८ मध्ये एक रिसर्च करण्यात आला होता. त्यात सांगण्यात आलं होतं की, फिट असलेल्या वृद्धांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अ‍ॅस्प्रिनने काही मदत मिळत नाही. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित तीन अभ्यासांनुसार, ७० वयानंतर फिट असलेल्या वृद्धांना दररोज अ‍ॅस्प्रिनचा हलका डोज दिल्यानंतर सुद्धा त्यांना हृदयविकाराचा झटका पडण्याचा धोका कमी झाला नाही. या रिसर्चमधून समोर आलं होतं की, वृद्धावस्थेशी संबंधित इतरही आाजारांचाही धोका याने कमी झाला नाही.


Web Title: Daily dose of asprin is no longer recommended by doctors for older adult to prevent heart problems
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.