covid 19 know about efficacy of covaxin and covishield vaccines in india | Corona Vaccination: देशात कोवॅक्सिन, कोविशील्डच्या वापरास सुरुवात; जाणून घ्या दोन्ही लसी कितपत प्रभावी

Corona Vaccination: देशात कोवॅक्सिन, कोविशील्डच्या वापरास सुरुवात; जाणून घ्या दोन्ही लसी कितपत प्रभावी

नवी दिल्ली: जवळपास वर्षभर कोरोना संकटाचा सामना केल्यानंतर आज लसीकरणास आरंभ झाला. कोरोना लसीकरण अभियानास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवात केली. मोदींच्या हस्ते देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात लसीकरण अभियानाचा शुभारंभ झाला. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य आहे. कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीसीजीआय) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.

कोरोना लसीबद्दल तुमच्याही मनात आहेत प्रश्न?; जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

कोविशील्ड लस-
कोविशील्ड लसीची निर्मिती ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटन-स्वीडनमधील फार्मास्युटिकल कंपनी ऍस्ट्राझेनेकानं मिळून केली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोविशील्ड लसीचं उत्पादन केलं आहे. कोविशील्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम अतिशय चांगले आहेत. या लसीचे दोन डोज अतिशय परिणामकारक असल्याचं सांगितलं गेलं. ब्रिटनमध्ये लसीच्या चाचण्या ९०-९५ टक्के प्रभावी ठरल्या. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या शरीरात अँटीबॉडी आणि व्हाईट ब्लड सेल्स (टी-सेल्स) विकसित झाल्या. कोविशील्ड लस मॉर्डना आणि फायझरच्या लसीपेक्षा बरीच वेगळी आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये; शास्त्रज्ञांचे म्हणणे काय? वाचा​​​​​​​

कोवॅक्सिन लस-
भारत बायोटेकनं कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही लस तयार करण्यासाठी जुनं तंत्र वापरलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पहिली लस देऊन लोकांना विषाणूची लागण केली जाते. त्यानंतर त्या विषाणूला मारलं जातं. मुंबईतल्या ६ केंद्रांवर कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे साईड इफेक्ट्स दिसून आल्यास कंपनीकडून भरपाई दिली जाईल. लस दिली गेल्यावर लोकांना एक फॅक्टशीट दिली जाईल. त्यात त्यांना पुढील ७ दिवसांत दिसणाऱ्या लक्षणांची माहिती नोंदवावी लागेल. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: covid 19 know about efficacy of covaxin and covishield vaccines in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.