शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

अरे व्वा! हिवाळ्यात वापरात असलेल्या कपड्यांपासून कोरोनापासून बचाव होणार; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 18:32 IST

CoronaVirus News & Latest Updates : शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही आहारात  विविध पदार्थांचे सेवनही सुरू आहे. सध्या कोरोनापासून बचाव करण्याबाबत तज्ज्ञांनी एक सकारात्मक दावा केला आहे. 

कोरोना व्हायरसनं गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरातील  शास्त्रज्ञांकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशात शेवटच्या टप्प्यातील लसीच्या चाचण्या सुरू आहेत. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सध्या आपण मास्क, सॅनिटायझर वापरत आहोत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहोत. तसंच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही आहारात  विविध पदार्थांचे सेवनही सुरू आहे. सध्या कोरोनापासून बचाव करण्याबाबत तज्ज्ञांनी एक सकारात्मक दावा केला आहे. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरस इन्फ्लुएन्जा व्हायरससारखा मोसमी नाही आणि कडाक्याच्या थंडीऐवजी वसंत ऋतूमध्ये वाढण्याची शक्यता आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनीही हिवाळ्यात कोरोनाचं रौद्ररुप दिसू शकतं. अशी भीती व्यक्त केली होती.  दरम्यान हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण जे कपडे घालतो ते आपला कोरोना व्हायरसपासूनही बचाव करण्यात मदत करू शकतात असा दावा ब्रिटनच्या तज्ज्ञांनी केला आहे. 

ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिडींगचे प्राध्यापक बेन निउमन यांनी सांगितलं की,  थंडीत वापरले जाणारे जाड  कपडे जसं की स्कार्फ, ग्लोव्ह्ज, स्वेटर हे पर्सनल पीपीई किट म्हणून कोरोपासून रक्षण करण्यासाठी  मदत करतील.  हिवाळ्याच्या मोसमात वापरात असलेल्या कपड्यांचा वापर कोरोनाच्या लढाईत ढाल म्हणून करता  येऊ शकतो. दरवर्षी आपण हिवाळ्यातील थंडी आणि आजारांपासून वाचण्यासाठी  गरम कपड्यांचा वापर करतो. ब्रिटिश तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार  कोरोनाच्या माहामारीत या कपड्यांनी आजारांपासून लांब राहता येऊ शकतं. 

कोरोनानंतर आता दुसऱ्या महामारीसाठी सज्ज राहावं; WHO चा जगातील देशांना इशारा

संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीमुळे ग्रस्त आहे. जगभरातील देशांची अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, पुढील महामारीसाठी जगानेही सज्ज राहावं. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडॅनॉम ग्रेबेसियस यांनी सोमवारी सांगितले की, पुढील महामारीसाठी जगाने अधिक चांगले तयार केली पाहिजे.

जगातील देशांना सार्वजनिक आरोग्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन संघटनेनं केलं आहे. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात पहिल्यांदा कोरोना विषाणूचा रुग्ण समोर आला होता. त्यानंतर आतापर्यंत जगातील २.७० कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात या विषाणूमुळे ८,८८,३२६ लोक मरण पावले आहेत. ही महामारी शेवटची नाही, इतिहासाने आपल्याला शिकवलं आहे, उद्रेक आणि साथीचा रोग जीवनाचं कटू वास्तव आहे.

परंतु जेव्हा पुढची महामारी येईल तेव्हा जगाने तयार राहिले पाहिजे. या वेळेपेक्षा जास्त तयारी जगातील सर्व देशांना ठेवावी लागेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. याआधी, ऑगस्टच्या सुरूवातीस, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूबद्दल इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोना व्हायरल खूप काळ राहू शकतो. डब्ल्यूएचओने कोविड -१९ च्या सहा महिन्यांच्या मूल्यांकनावर आणीबाणी समितीशी बैठक घेतल्यानंतर हे सांगितले होते.

डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटलं आहे की समितीने कोविड -१९ साथीचा दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. कोरोना विषाणूच्या अस्तित्वाला सात महिने झाले आहेत आणि दरम्यान समितीने कोरोना विषाणूच्या जोखमीचे आकलन करण्यासाठी चार वेळा बैठक घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी कोरोना व्हायरसच्या लसीचे मोठ्या प्रमाणात लसीकरण २०२१ मध्यापर्यंत शक्य नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना WHO च्या या दाव्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे पण वाचा-

रोज बडीशोप घातलेलं दूध प्याल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं विसराल

भय इथले संपत नाही! भारतात लहान मुलांमध्ये दिसलं कोरोनाचं घातक रुप, 'ही' आहेत लक्षणं

खुशखबर! भारतीय महिला शास्त्रज्ञानं तयार केली कोरोनाची लस; लवकरच चाचण्यांना सुरूवात होणार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी