खुशखबर! भारतीय महिला शास्त्रज्ञानं तयार केली कोरोनाची लस; लवकरच चाचण्यांना सुरूवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 05:13 PM2020-09-08T17:13:49+5:302020-09-08T17:28:39+5:30

२०१७ मध्ये स्पाईबायोटेक कंपनीची निर्मीती करण्यात आली होती. आता या कंपनीकडून कोरोना विषाणूंची लस तयार केली जात  आहे. 

Indian scientist sumi biswas oxford university new coronavirus vaccine begun trials | खुशखबर! भारतीय महिला शास्त्रज्ञानं तयार केली कोरोनाची लस; लवकरच चाचण्यांना सुरूवात होणार

खुशखबर! भारतीय महिला शास्त्रज्ञानं तयार केली कोरोनाची लस; लवकरच चाचण्यांना सुरूवात होणार

Next

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील भारतीय प्राध्यापक सुमी विश्वास यांनी कोरोना विषाणूंची लस तयार केली आहे. bloomberg.com च्या रिपोर्टनुसार  जगभरातील सगळ्यात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इंडिया इंस्टिट्यूटशी भागिदारी करून या लसीच्या मानवी चाचणीला ऑस्ट्रेलियामध्ये सुरूवात झाली आहे. 
प्राध्यापक सुमी विश्वास यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील जेनर इंस्टिट्यूमध्ये प्राध्यापक एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यासह काम केले आहे. प्रोफेसर एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यामार्फत तयार करण्यात आलेली लस पहिल्या टप्प्यात पोहोचली आहे. २०१७ मध्ये स्पाईबायोटेक कंपनीची निर्मीती करण्यात आली होती. आता या कंपनीकडून कोरोना विषाणूंची लस तयार केली जात  आहे. 

स्पाईकबायोटेक कंपनीचे कोरोना लसीचे मानवी परिक्षण ऑस्टेलियामध्ये सुरू आहे. ऑक्सफोर्डच्या प्राध्यापक आणि कंपनीचे सीईसो सुमी विश्वास यांनी सांगितले की दोन्ही टप्प्यातील ट्रायल दरम्यान शेकडो लोकांना लसीचे डोज दिले जाणार आहेत. नवीन कोरोना लसीत हेपेटायटिस बी एंटीजेन व्हायरसच्या कणांना वाहकांप्रमाणे वापरलं जात आहे.  या व्हायरसचे प्रोटीन्स कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीन्सशी जुळलेले आहेत. 

Sumi Biswas

याद्वारे शरीरात रोगप्रतिकारकशक्ती विकसीत केली जाणार आहे. सुमी विश्वास यांनी ऑक्सफोर्डमधून पीएचडीची  पदवी घेतली आहे. जेनर इंस्टीट्यूट सोबत मलेरियाची लस तयार करण्यासाठी  १ वर्ष काम केलं आहे. बँगलोर युनिव्हर्सिटीत मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास केल्यानंतर २००५ मध्ये सुमी विश्वास या ब्रिटनला गेल्या. SpyBiotech ने सीरम इंस्टीट्यूटसोबत भागिदारी केली आहे.  सीरम इंस्टीट्यूट  आता एक अब्ज लसीचे डोज तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. जवळपास १९.८ मिलियन फंडिग जमा करण्यात आली आहे. 

जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४० टक्के रुग्ण सापडताहेत भारतात

दरम्यान कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. देशात सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, रविवारी जगभरात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण एकट्या भारतात सापडले आहेत. तसेच भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमध्ये सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित आकडेवारीही भारतापेक्षा कमी आहे.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी देशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटून ७४ हजार ९६० झाली आहे. मात्र सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून ११२५ झाली. देशात एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ७२ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी भारतात तब्बल ९४ हजार रुग्ण सापडले होते. तर शनिवारीसुद्धा देशात जवळपास एवढेच रुग्ण सापडले होते. याचा अर्थ सरलेल्या आठवड्याच्या अखेरीस भारतात सुमारे १ लाख ८४ हजार नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.

हे पण वाचा-

भय इथले संपत नाही! भारतात लहान मुलांमध्ये दिसलं कोरोनाचं घातक रुप, 'ही' आहेत लक्षणं

रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात

Web Title: Indian scientist sumi biswas oxford university new coronavirus vaccine begun trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.