व्हिटामीन 'D' ने कोरोना विषाणूंपासून बचाव होतो? तज्ज्ञांनी दिली नवीन माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:08 AM2020-06-30T11:08:26+5:302020-06-30T11:23:54+5:30

याआधी करण्यात आलेल्या संशोधनात व्हिटामीन डी मुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. असे सांगण्यात आले होते.

CoronaVirus : Vitamin D supplements does not prevents coronavirus | व्हिटामीन 'D' ने कोरोना विषाणूंपासून बचाव होतो? तज्ज्ञांनी दिली नवीन माहिती

व्हिटामीन 'D' ने कोरोना विषाणूंपासून बचाव होतो? तज्ज्ञांनी दिली नवीन माहिती

Next

कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात वाढत आहे. कोरोनाची माहामारी नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे संशोधन सुरू आहे. संशोधनातून व्हायरसच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.  ब्रिटनमध्ये आरोग्य अधिकारी आणि आरोग्य तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात नवीन माहिती समोर आली आहे. व्हिटामीन डी मुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही. याआधी करण्यात आलेल्या संशोधनात व्हिटामीन डी मुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. असे सांगण्यात आले होते. आता ब्रिटेनच्या नॅशनल इंस्टीट्यूट फॉर हेल्थ एंड केअर एक्सेलेंस (NICE)ने याबाबत संशोधन केलं आहे.  

या संशोधनात व्हिटामीन डी आणि कोरोना व्हायरस यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यात आला होता. या संशोधनातून असे दिसून आले की, व्हिटामीन डी च्या सप्लिमेंट्सनी कोरोनापासून बचाव होऊ शकतो. याबाबत कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. NICE मधील सेंटर गाईडलाईन्सचे प्रमुख  पॉल क्रिस्प यांनी सांगितले की, व्हिटामीन डी चे आरोग्याला अनेक फायदे आहेत. परंतू व्हिटामीन डी मुळे कोरोनापासून बचाव होतो. याबाबत कोणतेही पुरावे मिळाले आहेत.

विटामिन-D कोरोना से बचाता है या नहीं? वैज्ञानिकों ने कही नई बात

या विषयावर अधिक रिसर्च सुरू आहे. याआधीही ब्रिटनची प्रमुख संस्था एनएचएसने लोकांना व्हिटामीन डी च्या सप्लीमेंट्स घेण्याचे आवाहन केले होते. कारण कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने अनेक लोक घरी आहेत.  त्यामुळे व्हिटामीन्सची कमतरता भासू शकते.

लंडनच्या इंपेरिअल कॉलेज ऑफ इम्युनोलॉजीचे प्रोफेसर चार्ल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांनी व्हिटामीन डी च्या सप्लिमेंट्स घेतल्यास नुकसानकारक ठरू शकतं. त्यापेक्षा व्हिटामीन डी असलेल्या पदार्थांचे आहारात सेवन करायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटामीन डी च्या टॅबलेट्सचे सेवन करू नये.

व्हिटामीनच्या कमतरेमुळे ताप येणं, थकवा येणं, हाडं आणि पाठीत वेदना, मानसिक ताण, केस गळणं, मासंपेशीचं वेदना, अशी लक्षणं जाणवतात. याशिवाय हद्याचे ठोके वाढणं अशा समस्या उद्भवतात.  आहारात काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता. 

नियमीत पनीरचं सेवन केल्यास शरीरातील व्हिटामीन डी ची कमतराता भरून काढण्यास मदत होईल. दुधापेक्षा दही पचण्यास हलके असते. दह्याच्या सेवनाने पचनाशी निगडीत समस्या दूर होऊन शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण होते. या शिवाय सोयामिल्कच्या सेवनाने शरीला व्हिटामीन डी मिळतं. याशिवाय यात अनेक पोषक घटक असतात. सोयामिल्कमध्ये आयर्न, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात.

संक्रमणाचं कारण ठरू शकतो घामाने ओला झालेला मास्क; जाणून घ्या बचावाचे उपाय

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

Web Title: CoronaVirus : Vitamin D supplements does not prevents coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.