शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

आनंदाची बातमी! भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले कोरोनाचे उपचार, नव्या पद्धतीने संसर्ग रोखता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 5:58 PM

CoronaVirus News & Latest Updates : भारतीय वैज्ञानिकांनी आता कोरोनावर प्रभावी ठरतील अशी औषधं आणि संभाव्य उपचारांचा शोध लावला आहे.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.  कोरोनाच्या लसीकरणाची तयारी तरी सरकारकडून सुरू असतील तर कमी कालावधीत सगळ्यांनाच लस मिळणं कठीण आहे. काही लाख लोकांनाच लस मिळू शकते. त्यात फ्रंटलाईन व्रर्कर्स, आरोग्यसेवेतील कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. भारतीय वैज्ञानिकांनी आता कोरोनावर प्रभावी ठरतील अशी औषधं आणि संभाव्य उपचारांचा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांनी कोरोनाच्या उपचारासाठी मदत होईल.

तामिळनाडुच्या अलगप्पा महाविद्यालय आणि स्वीडनच्या केडीएच रॉयल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधानुसार संशोधकांनी औषधं आणि मिश्रणांची एक सुची तयार केली आहे. यांवर संक्रमणाच्या उपाचारांच्या अनुशंगाने चाचणी केली जाणार आहे. ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’  या जर्नलमध्ये हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. 

सोफा, खुर्चीपेक्षा जास्त फायदेशीर ठरतं जमिनीवर बसणं; जाणून घ्या 'ही' ४ वैज्ञानिक कारणं

‘ड्रगबँक’  आकड्यांच्या अध्ययनावर आधारीत हा शोध जर्नल ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रकाशित लेखातून समोर आलेल्या माहितीनुसार  कोरोना व्हायरस कोणत्या पद्धतीने हल्ला करतो. याबाबत अधिक परिक्षण सुरू आहे. या संशोधनाचे प्रमुख वैभव श्रीवास्तव आणि अरूल मुरुगन यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन उपचारपद्धतीमुळे व्हायरसचा प्रसार कमी होण्यासाठी मदत होईल. 

कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

श्रीवास्तव यांनी सांगितले की, व्हायरस खूप वेगाने आपला प्रसार वाढवत आहे.  कारण व्हायरस प्रोटीनमध्ये सतत बदल होत असतो. श्रीवास्तव यांनी सांगितले की, अशा कोणत्याही औषधामुळे व्हायरसच्या अनेक प्रोटिन्सचा नष्ट करता येऊ शकतं. असे गुण उपलब्ध असतील अशी वेगवेगळी औषध शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. 

कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार

जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकात्कालीन प्रमुख डॉ. माइकल रेयान यांनी  कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होत मृतांचा आकडा वाढत आहे. म्हणूनच  लोकांनी आपल्या प्रियजनांच्या जास्त जवळ जाण्यापेक्षा दूर राहून संवाद साधायला हवा.

डॉ. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत माहामारीचा प्रकोप वाढत आहे. अमेरिकेत चांगली आरोग्य प्रणाली आणि अधुनिक तंत्रज्ञान विकसित आहे. तरिही कमी कालावधीत संक्रमण झाल्याने एक ते दोन लोकांचा मृत्यू होणं ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचे एकूण  तीन तृतीयांश केसेस अमेरिकेत आहेत.

जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार देशात संक्रमणामुळे आतापर्यंत २ लाख ८० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  गळाभेट घेणं  हा जवळचा संपर्क मानला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्राच्या एंजेसीने कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा जास्त  धोका असलेल्या देशातील लोकांना गळाभेट न घेण्याचे आवाहन केलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य