Coronavirus vaccine india tracker oxford zydus cadilla and bharat biotech vaccine | दिलासादायक! भारतात ३ लसींच्या चाचण्यांना सुरूवात; अ‍ॅडवान्स लस पोहोचली तिसऱ्या टप्प्यात

दिलासादायक! भारतात ३ लसींच्या चाचण्यांना सुरूवात; अ‍ॅडवान्स लस पोहोचली तिसऱ्या टप्प्यात

भारतात सध्या तीन लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यातील एक लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी दुसरी भारत बायोटेक आणि तिसरी लस  जायडस कॅडला कंपनीची आहे. ऑक्सफफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राजेनेका कंपनीच्या सहयोगानं तयार होत असलेली लस लसीच्या सगळ्यात अ‍ॅडवान्स स्टेजमध्ये आहे. सीरम इंडिया इन्स्टिट्यूटनं देशभरात १४ ठिकाणी दीड हजार लोकांवर लसीची चाचणी करण्याचे ठरवले होते भारताव्यतिरिक्त ब्रिटन, ब्राझील, अमेरिकेसह अन्य देशांमध्ये ऑक्सफोर्डच्या लसीची चाचणा सुरू आहे. या लसीच्या चाचण्यांवर आयसीएमआरचे ही लक्ष आहे. 

आयसीएमआर आणि भारत बायोटेकने मिळून तयार केलेल्या कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या लसीचे नाव कोवॅक्सिन आहे. ही एक इनएक्टिवेटेट लस आहे. ही याद्वारे शरीरात व्हायरसशी लढत असलेल्या एंटीबॉडी विकसित होतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांवर केलेल्या परिक्षणात या लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील परिक्षण सध्या सुरू आहे. 

तिसरी लस जायडस कॅडिला. या लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. DCGI ने देशात  तयार करण्यात आलेल्या या लसीला मानवी चाचणीसाठी जुलै महिन्यात परवानगी दिली होती. डीएनएबेस्ड जायडस कॅडिला ही लस अहमदाबादच्या वॅक्सिन टेक्नोनॉजी सेंटरमध्ये विकसित करण्यात आली होती. या लसीची उंदरांवर आणि सश्यांवरील चाचणी पूर्ण झाली असून याचे रिपोर्ट सध्या DCGI कडे देण्यात आले आहेत. 

द लैंसेट में भी जिक्र

कोणत्याही लसीशिवाय ३ देशांनी कोरोनावर 'अशी' केली मात

 जगभरासह जपान, कोरिया आणि सिंगापूर या देशांमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरलं. त्यानंतर लस तयार होण्याची वाट न पाहता ,या देशांतील लोकांनी कोरोनावर मात करत असलेल्या प्रभावी पद्धतींचा अवलंब करायला सुरूवात केली. संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गापासून बचावासाठी या पद्धतींचा वापर केला जात आहे. पण ज्या वेगानं या तीन देशातील लोकांनी कोरोनावर मात करण्यासाठी या तंत्रांचा वापर केला.त्या वेगाने क्वचित कोणत्याही देशात या पद्धतींचा वापर केला जात आहेत.

संपूर्ण जगभरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कच्या वापरावर जोर दिला जात आहे. जपान, कोरिया आणि सिंगापूरसारख्या देशात मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. याचा परिणाम चांगला दिसून आला आहे. न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये मागील काही दिवसात छापण्यात आलेल्या माहितीनुसार कापडापासून तयार केलेला मास्क सावधगिरीनं वापरल्यास लसीप्रमाणेच  प्रभावी ठरू शकतो. हे एक आंतरराष्ट्रीय नियतकालीक आहे.

जेव्हा मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर केला जातो तेव्हा संक्रमित व्यक्तींच्या शरीरातून कोरोना व्हायरसचे ड्रॉपलेट्स खूप कमी प्रमाणात वातावरणात एकत्र होतात. जेव्हा कमी प्रमाणात ड्रॉपलेट्स वातावरणात एकत्र होतात आणि आजूबाजूच्या लोकांनी मास्क लावलेला असतो. तेव्हा शरीरात कमी प्रमाणात व्हायरसचं संक्रमण पसरतं. यामुळे गंभीर स्वरुपाचं संक्रमण होण्यापासून वाचता येऊ शकतं. 

अशा स्थितीत जेव्हा कोणच्याही व्यक्तीच्या शरीरात नवीन व्हायरसचा प्रवेश होतो. तेव्हा शरीरात व्हायरसचा लोड कमी असतो. त्यावेळी रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसला ओळखून लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करण्यासाठी आणि व्हायरसला नष्ट करण्यासाठी पूर्ण वेळ घेते. म्हणून न लसी तयार होत नाही तोपर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी मास्कचा वापर प्रभावी ठरू शकतो.

हे पण वाचा-

भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus vaccine india tracker oxford zydus cadilla and bharat biotech vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.