Coronavirus update second wave of covid-19 infection experts suggests | भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार? तज्ज्ञांनी सांगितलं यामागचं खरं कारण, जाणून घ्या

भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार? तज्ज्ञांनी सांगितलं यामागचं खरं कारण, जाणून घ्या

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सगळ्यात देशात कठोर पाऊलं उचलली जात असून उपाययोजना केल्या आहेत. हळूहळू लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशा स्थितीत कोरोनाची लाट पुन्हा येऊ शकते का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत तज्ज्ञांचे काय  म्हटणं आहे  हे जाणून घेणं महत्वाचे आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने सध्या कमी झालेलं कोरोनाचं प्रमाण आणि दुसरी लाट याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. इंडियन एक्स्प्रेसने या समितीतील दोन तज्ज्ञांकडून संभाव्य दुसऱ्या लाटेबद्दल त्यांचं मत जाणून घेतलं आहे.

केंद्र सरकारच्या समितीतील सदस्य प्रा. मनिंदर अग्रवाल यांनी सांगितले की, ‘ युरोपातील काही देशांत काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमतरता आढळून आली होती. आता भारतातही तशीच स्थिती आहे. इटलीबाबतच म्हणायचं झालं तर तिथं विकसित झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे कोरोनचा प्रसार मोठया प्रमाणवर झालेला नाही. तिथं कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली पण तिथं आता दुसरी लाट आली आहे. सगळ्या देशांत आणि प्रदेशांत कोरोनाची दुसरी लाट येईलच असं काही नाही. म्हणून जर भारताने अजून काही महिने सावधगिरी बाळगली तर कोरोनाच प्रसार पूर्णपणे कमी होण्यास  मदत होऊ शकते.''

वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापिका गगनदीप कंग यांनी दिलल्या माहितीनुसार सण उत्सवाचा काळ, थंडीचे दिवस आणि वाढणारं प्रदूषण यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. कोरोना महामारी आणि हिवाळा यांच्यातील संबंध अजून पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. इतर आजार आणि व्हायरसशी  हवामानातील बदलांचा संबंध असतो. कोरोनाच्या उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपी निरुपयोगी; ही उपचारपद्धती रोखणार? ICMR चा दावा

इतर आजांराचा आणि व्हायरसचा हिवाळ्यात झालेला प्रसार लक्षात घेता या हिवळ्यात कोरोनाचा प्रसार होणार नाही अशी शक्यता नाकारता येत नाही. आता अनलॉक झाल्यामुळे पुन्हा  प्रदूषण वाढले.  प्रदूषणामुळे कोरोनाच्या संसर्गवाढीमध्ये महत्त्वाचा घटक ठरू शकतो. प्रदूषित हवेमुळे  श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. म्हणून प्रदूषणामुळे कोरोनाा धोका जास्त प्रमाणात उद्भवू शकतो. कोरोनातून बरं झाल्यानंतर २ ते ३ महिन्यांपर्यंत दिसू शकतात 'ही' गंभीर लक्षणं; तज्ज्ञांचा दावा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus update second wave of covid-19 infection experts suggests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.