कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी आत्तापर्यंत कोणतीही लस किंवा औषधं शोधण्यात आलेले नाही. कोरोना व्हायरसशी तीन पद्धतीने सामना करता येऊ शकतो. त्यातील सगळ्यात पहिला लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्हायरसचं संक्रमण रोखता येऊ शकतं. नंतर अग्रेसिव्ह टेस्टींग म्हणजे चाचणी केल्यामुळे आजार पसरण्यापासून थांबवता येऊ शकतं.
संक्रमणाचा वेग कमी करणं
कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरातून होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे कोरोना पूर्णपणे थांबेल की नाही याबाबत वैज्ञानिकांना शंका होती. कारण लॉकडाऊनमुळे फक्त संक्रमणाचा वेग कमी केला जाऊ शकतो. कोरोना व्हायरसची लस तयार होण्यासाठी अजून १ वर्षाचा काळ लागू शकतो. संक्रमणाशी लढण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा वापर अनेक ठिकाणी केला जात आहे.
जर कोरोनाचे संक्रमण एका वर्षाच्या आत थांबले नाही तर या व्हायरसमुळे जगभरातील लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या संक्रमित होण्याची शक्यता आहे. या कालावधीत लोकांमध्ये हर्ड इम्युनिटीचा विकास आपोआप झाल्यामुळे संक्रमणाला रोखता येऊ शकतं. तर एकिकडे माणसांच्या आरोग्याचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे अनेक देशांमध्ये दीर्घकाळ लॉकडाऊन सुरू आहे.
कोरोना व्हायरसचा रिप्रोडक्शन नंबर म्हणजेच R0 2 आणि 2.5 यांमध्ये आहे. म्हणजेच संक्रमित व्यक्तीकडून दोनपेक्षा जास्त लोकांपर्यंत संक्रमण पोहोचतं अशा स्थितीत हर्ड इम्यूनिटी संक्रमण पसरवण्यापासून वाचवू शकते. कोरोनापासून बचाासाठी सुरू असलेले उपाय दीर्घकाळापर्यंत आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. पोलियो आणि कांजण्यांसारख्या आजारांनाही लसीच्या माध्यमातून हर्ड इम्यूनिटीतून हरवण्यात आले होते.
कोरोना विषाणूंपासून बचावासाठी व्हायरल झालं आहे 'हे' औषध; मागणीत झपाट्याने वाढ
कोरोनावर १०० % प्रभावी ठरणार अश्वगंधा आणि गुळवेळ; रामदेव बाबांचा दावा, जाणून घ्या यामागचं कारण