Coronavirus study in lancet journal herd immunity is dangerous approach for covid-19 says 80 scientist | WHO सह ८० शास्त्रज्ञांची धोक्याची सुचना; कोरोनापासून बचावासाठी 'हा' उपाय ठरतोय जीवघेणा

WHO सह ८० शास्त्रज्ञांची धोक्याची सुचना; कोरोनापासून बचावासाठी 'हा' उपाय ठरतोय जीवघेणा

जगभरातील २०० पेक्षा जास्त देशांना कोरोनाच्या माहामारीचा सामना करावा लागत आहे. या माहामारीला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील आरोग्य सेवेतील कर्मचारी, शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.  गेल्या काही महिन्यापासून कोरोनापासून बचावसाठी हर्ड इम्यूनिटी तयार व्हायला  हवी असं मत अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केलं होतं. हर्ड इम्यूनिटी म्हणजेच लोकसंख्येचा मोठा भाग हा कोरोनाने संक्रमित व्हायला  हवा.  जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत धोक्याची सुचना दिली होती. याशिवाय जगभरातील ८० वैज्ञानिकांनी, तज्ज्ञांनी हर्ड इम्यूनिटीचा अवलंब जीवघेणा ठरू शकत असल्याचे सांगितले आहे. 

आरोग्य संशोधन नियतकालिक लॅसेंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर ८० वैज्ञानिक आणि संशोधकांनी हर्ड इम्यूनिटीबाबत एक जाहीर पत्र लिहिले आहे.  या पत्रात नमुद केलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा अवलंब करणं कितपत सुरक्षित आहे याबाबत  पुरावे नाहीत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाला रोखण्यासाठी निर्णायक  आणि तात्काळ उपायांचा अवलंब करायला हवा. 

हर्ड इम्यूनिटीपेक्षा लसीकरण सुरक्षित

लॅसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन केल्यामुळे आणि इतर समारंभ रोखल्यामुळे संक्रमणाचा वेग अनेक ठिकाणी कमी झाला आहे. तर काही देशात  कोरोनाची संक्रमणाची दुसरी लाट आलेली दिसून येते. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हर्ड इम्यूनिटीच्या उपायाचा अवलंब करणं फायद्याचे ठरणार नाही.  हर्ड इम्यूनिटी अशी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये  मोठ्या समुहाला आजाराचं संक्रमण झाल्यामुळे आजाराशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. एंटीबॉडी तयार करण्याची  हीच क्रिया लसीकरणाच्या माध्यमातूनही होऊ शकते. तज्ज्ञांनी  सांगितले की, हर्ड इम्यूनिटीचा धोका पत्करण्यापेक्षा लसीची वाट पाहणं योग्य ठरेल. 

विश्व स्वास्थ्य संगठन प्रमुख(File Photo)

हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली धोक्याची सुचना

WHO चे प्रमुख ट्रेड्रोस अडनहॅम घेब्रियेसुस यांनी समिती बैठकीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार हर्ड इम्यूनिटी अशी संकल्पना आहे. ज्याचा वापर लसीकरणासाठी केला जातो. या प्रकारात लसीकरण एका मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर कोणत्याही व्हायरसपासून लोकसंख्येचा बचाव करता येऊ शकतो. 

हर्ड इम्यूनिटीबाबत हा मुद्दा पटवून देताना घेब्रियेसुस यांनी कांजिण्या या आजाराचे उदाहरण दिले होते. त्यांनी सांगितले की,  एकूण लोकसंख्येच्या  ९५ टक्के भागाला लसी दिली गेल्यास उरलेल्या ५ लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी असल्यास व्हायरपासून बचाव होऊ शकतो. तसंच याबाबत पोलियो या आजाराची सीमारेषासुद्धा ८० टक्के आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, हर्ड इम्यूनिटी व्यक्तीला धोक्यात न घातला कोणत्या व्हायरपासून सुरक्षित ठेवून  मिळवता येऊ शकते. माहामारीपासून बचाव करण्यासाठी लोक हितासाठी  इतिहासात हर्ड इम्युनिटीचा अवलंब खूप कमी प्रमाणात करण्यात आला होता. खुशखबर! एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची सुरक्षित अन् प्रभावी लस मिळणार, अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

पुढे त्यांनी सांगितले होते की, ज्या व्हायरसबाबत आपल्याला पूर्ण माहिती नाही. त्या व्हायरसचा प्रसार होऊ देणं योग्य नाही. या माहामारीपासून बचावासाठी कोणताही रामबाण उपाय सापडलेला नाही. कोरोनाच्या विरोधात इम्यूनिटी विकसित करण्याबाबत माहितीचा अभाव असल्याचे सांगितले होते.  उदा. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास शरीरात आजाराशी लढत असलेल्या एंटीबॉडी किती दिवसांपर्यंत राहू शकतात याची कल्पना नसते. जास्तीत जास्त देशांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या ही व्हायरसच्या संपर्कात आली होती. अजूनही अनेक देश व्हायरसच्या प्रसाराबाबत असंवेदनशील आहेत. मागच्या चार दिवसात अमेरिका आणि युरोपच्या काही भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. जास्त उपवास केल्याने होऊ शकतो 'असा' त्रास, जाणून घ्या उपवास करूनही कसं निरोगी राहायचं?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus study in lancet journal herd immunity is dangerous approach for covid-19 says 80 scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.