शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 14:20 IST

CoronaVaccine news & Latest Updates: DCGIने  रशियाच्या स्पुतनिक V लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. भारतातील तब्बल १०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे.

कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.  आता अनेक देशांमध्ये अनलॉक करण्याला सुरूवात झाली आहे. पण कोरोनाचा प्रसार मात्र थांबलेला नाही. अशा स्थितीत कोरोना व्हायरसची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान भारतातील  ३ स्वदेशी लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांना सुरूवात होत आहे. लसीच्या चाचणीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या आणखी एका लसीची चाचणी सुरू होणार आहे. या महिन्यात, DCGIने  रशियाच्या स्पुतनिक V लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिली. भारतातील  तब्बल १०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे.

डिसीजीआयने यापूर्वी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडला कोव्हिड-19 लस स्पुतनिक व्हीची दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्या घेण्यासाठी परवागनी दिली होती. कंपनीने म्हटले आहे की या लशीला आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडला (RDIF) भारतीय नियंत्रक जनरलकडून (डीजीसीआय) मंजुरी मिळाली होती. कंपनीने म्हटले होते की हा एक नियंत्रित अभ्यास असेल, जो अनेक केंद्रांवर केला जाईल.वृत्तसंस्था स्पुटनिकने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या टप्प्यात पोहचण्यापूर्वी लसीच्या उर्वरित दोन टप्प्यांतील चाचणी करण्यात येणार आहे. 

गेल्या आठवड्यात डीसीजीआयच्या तज्ज्ञ समितीने डॉ. रेड्डीच्या लेबोरेटरीजना रशियन कोविड -१९ लस उमेदवार स्पुतनिक व्ही यांच्या टप्प्याटप्प्याने क्लिनिकल चाचण्या घेण्यास परवानगी देण्याची शिफारस केली होती. सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार १४०० लोक तिसऱ्या टप्प्यात सामिल होऊ शकतात. याआधी फार्मा कंपनी दुसऱ्या टप्प्याची सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटीचा डेटा देईल. त्यानंतरच तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू होईल. डॉ रेड्डीज आणि RDIF सप्टेंबर मध्ये भारतात लशीचे वितरण करण्यासाठी भागीदारी केली आहे. यानुसार आरडीआयएफ नियामक मान्यतेवर डॉ. रेड्डी लसीचे 10 कोटी डोस पुरवेल. कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

 डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला

भारताची मोठी फार्मास्युटीकल कंपनी डॉ. रेड्डीजवर मोठा सायबर हल्ला झाला होता. यामुळे कंपनीने जगभरातील कारखान्यांमधील काम थांबविले होते. कंपनीचा डेटा धोक्यात असल्याने सर्व्हरमधील माहिती हल्लेखोरांना न मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, सायबर हल्ला झाल्याने कंपनीने  सर्व डेटा सेंटर आयसोलेट केले  होते. Dr Reddy's चे भारत, रशिया, ब्रिटन, अमेरिकेसह ब्राझीलमध्ये कारखाने आहेत. कंपनीवर हा सायबर हल्ला बुधवारी रात्री 2.30 वाजता झाला होता. सावधान! रोजच्या वापरातील 'या' ६ वस्तूंमुळे होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या