CoronaVirus : डोळ्यांच्या वेदना ठरू शकतात कोरोनाच्या इन्फेक्शचं मोठं कारण, जाणून घ्या रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 04:40 PM2020-04-14T16:40:04+5:302020-04-14T16:41:30+5:30

इटलीच्या लोकांनी डोळ्यात जळजळ होण्याच्या लक्षणांवर गुगल सर्च सर्वाधिक केलं होतं.

CoronaVirus : Scientist believes eye pain is corona virus symptom after tracking google myb | CoronaVirus : डोळ्यांच्या वेदना ठरू शकतात कोरोनाच्या इन्फेक्शचं मोठं कारण, जाणून घ्या रिसर्च

CoronaVirus : डोळ्यांच्या वेदना ठरू शकतात कोरोनाच्या इन्फेक्शचं मोठं कारण, जाणून घ्या रिसर्च

Next

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं असताना भारतात सुद्धा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशा परिस्थीतीत रुग्णांला सर्दी, खोकला सोडता काही वेगळ्या शारीरिक समस्या जाणवत असतात. याबद्दल एक रिसर्च तुम्हाला सांगणार आहोत. एका संशोधकाने गुगलवरील प्राप्त झालेल्या डेटाचा वापर करून लक्षणांबाबत  माहिती स्पष्ट केली आहे. यानुसार  डोळ्यांचे दुखणं सुद्धा  कोरोना व्हायरसचं लक्षण असू शकतं. कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. याशिवाय डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होणे हे सुद्धा कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचं लक्षण असू शकतं.

स्टिफन्स डेविडोवित्ज यांनी या रिसर्चसंबंधी माहिती दिली आहे.  त्यांच्यामते गुगल सर्च रुग्णांच्या लक्षणांना ट्रॅकिंग करण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे एका सामान्य व्यक्तीला कोरोनाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवलं जाऊ शकतं.  गुगलची मदत घेताना काही लोकांनी श्रवणक्षमता कमी होण्याची सुद्धा तक्रार केली आहे.  कसलाही वास न येणं म्हणजेच एनोस्मिया ची लक्षणं ३० ते ६० टक्के लोकांमध्ये जाणवली आहेत.

स्टिफन्स यांनी केलेल्या विश्लेषणानुसार पुढील काही दिवसात ही समस्या कोरोनाच्या लक्षणांचं केंद्रस्थान असणार आहे.  डोळ्यांच्या वेदना  हे कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये सगळ्यात कॉमन जाणवत असलेलं लक्षण असून स्पेन आणि ईराण मधील लोकांना असा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतआहे. 

इटलीच्या लोकांनी डोळ्यात जळजळ होण्याच्या लक्षणांवर गुगल सर्च सर्वाधिक केलं होतं. इटलीमध्ये  कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. डोळ्यांच्या वेदनांना कोरोनाचे लक्षणं असल्याच पूर्णपणे घोषित केले नसले. तरी डोळे लाल होणे, असह्य वेदना, डोळे चुरचुरणे अशा समस्या अनेक देशातील कोरोनाग्रस्तांना जाणवल्याचं या रिसर्चमध्ये स्पष्ट झालं आहे.

Web Title: CoronaVirus : Scientist believes eye pain is corona virus symptom after tracking google myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.