ऐन सणासुदीच्या काळात धडकणार कोरोनाची तिसरी लाट? सर्वांनी ऐकायलाच हवा डॉ. गुलेरियांचा 'हा' खास सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 16:15 IST2021-10-06T16:14:34+5:302021-10-06T16:15:22+5:30
आता दुसरी लाट नियंत्रणात आहे. पण पुढील दसरा, दिवाळी, छठ पूजा सारख्या सणात तिसऱ्या लाटेचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांचा सल्ला समजून घ्यायला हवा.

ऐन सणासुदीच्या काळात धडकणार कोरोनाची तिसरी लाट? सर्वांनी ऐकायलाच हवा डॉ. गुलेरियांचा 'हा' खास सल्ला!
सणासुदीसोबतच देशात कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. दुसरी लाटही अशीच सणासुदीच्या काळातच आली होती. याच वर्षाच्या मार्च महिन्यात होळीनंतर, कोरोना रुग्ण संख्येत अचानक वाढ व्हायला सुरुवात झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर पाहता पाहता एक-दीड महिन्याच्या आतच दुसऱ्या लाटेने एवढा वेग घेतला, की सर्वत्र हाहाकार माजला होता. कुठे ऑक्सिजनची कमतरता, कुठे अत्यावश्यक औषधांचा अभाव, कुठे बेडसाठी मारामारी सुरू होती, तर कुठे रुग्ण रस्त्यावर मरताना दिसत होते. एवढेच नाही, तर दुसऱ्या लाटेची आठवण जरी झाली, तरी शरीराचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. (CoronaVirus Risk of third wave with start of festive season Dr Randeep Guleria warns virus not ended yet)
आता दुसरी लाट नियंत्रणात आहे. पण पुढील दसरा, दिवाळी, छठ पूजा सारख्या सणात तिसऱ्या लाटेचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांचा सल्ला समजून घ्यायला हवा.
'सणासुदीच्या काळात आनंद घरी घेऊन या, कोरोना संक्रमण नाही' -
डॉक्टर गुलेरिया यांनी लोकांना आवाहन केले आहे, की सण साजरे करा, आनंद साजरा करा, मात्र एक गोष्ट लक्षात असून द्या, आनंद घरी घेऊन या कोरोना संक्रमण नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुलेरिया यांचे एक व्हिडिओ स्टेटमेंट शेअर केले आहे, यात त्यांनी जनतेला सणांच्या काळात अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, 'माझा प्रत्येकाला एवढाच सल्ला असेल, की आपण सण साजरा करा, पण हा संसर्ग पसरू नये, अशा प्रकारे साजरा करा. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असू द्या. आपण सण साजरा केला, पण त्यामुळे आपल्याच परिसरात कोरोना रुग्ण वाढले आणि त्यांना रुग्णालयांत दाखल व्हावे लागले, आयसीयूत भरती व्हावे लागले, हेही योग्य ठरणार नाही. हा तर सणांचा नवा निगेटिव्ह इफेक्ट होईल. यामुळे सण साजरा करा, पण त्याच बरोबर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरही असू द्या.'
व्हायरस अद्यापही संपलेला नाही -
गुलेरिया म्हणाले, 'हे समजले पाहिजे की व्हायरस अजूनही अस्तित्वात आहे. आपल्या सणांना सुरूवात होत आहे. अनेक सण असे आहेत, जे आपल्याला कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत साजरे करण्याची इच्छा असते. दसरा, दुर्गा पूजा, करवा चौथ, दिवाळी किंवा छठ पूजा, असे अनेक सण आता जवळ येत आहेत. पण हे सण जसजसे जवळ येत आहेत तसतसे आपणही सावध राहण्याची गरज आहे. कारण आपण हे समजून घेतले पाहिजे की हा विषाणू अजूनही अस्तित्वात आहे आणि हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये अधिकाधिक पसरण्याची संधी शोधत आहे.
त्यौहारों में खुशियाँ घर लाएँ, कोरोना संक्रमण नहीं ।
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 6, 2021
इस वर्ष मनाएं त्यौहार भी और रखें ख़ास ख़याल कोरोना अनुकूल व्यवहारों का भी : डॉ रणदीप गुलेरिया, निदेशक, AIIMS, नई दिल्ली#COVIDGuruKool#Unite2FightCorona#COVIDSafeFestivities@PMOIndia@mansukhmandviya@ianuragthakurpic.twitter.com/4OKq19Xoqv
मास्क, हॅन्ड सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टंसिंगनेच होईल कोरोनापासून बचाव -
गुलेरिया म्हणाले, 'कोरोना थांबविण्यासाठी कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित मास्क वापरा. तो चांगल्या प्रकारे लावणे आवश्यक आहे. फिजिकल डिस्टंसिंग ठेवायला हवे. जेणेकरून विषाणू अधिक पसरणार नाही. याच बरोबर नियमितपणे हात धुवा आणि गर्दी होऊ देऊ नका. तसेच गर्दीच्या ठिकाणी जेणे टाळा.