CoronaVirus : Oxford university coronavirus vaccine europe supports india manufacturers | खुशखबर! एकमात्र कोरोनाची लस यावर्षीच यशस्वीरित्या तयार होणार, भारतात उत्पादनाला सुरूवात

खुशखबर! एकमात्र कोरोनाची लस यावर्षीच यशस्वीरित्या तयार होणार, भारतात उत्पादनाला सुरूवात

कोरोनाच्या माहामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी अजूनही कोणतंही औषध किंवा लस तयार झालेली नाही. गंभीर आजाारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची कोरोनाची लस AZD1222 ने आशेचा किरण दाखवला आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये ऑक्सिफोर्डच्या लसीचे परिक्षण यशस्वी झाले आहे. वॉश्गिंटन पोस्टच्या रिपोर्टनुसार ही एक मात्र अशी लस आहे जी या वर्षाच्या अखेरपर्यंत यशस्वीरित्या तयार होऊ शकते. 

ऑक्सफोर्ट युनिव्हर्सिटी तयार करत असलेली कोरोनाची AZD1222 ही लस इतर प्रयोगांच्या तुलनेत सकारात्मक परिणाम दर्शवत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पश्चिमेकडील अनेक देश या लसीबाबत सकारात्मक आहेत. सुरूवातीच्या परिक्षणात या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. आता मोठ्या  स्तरावर परिक्षणातील निकाल पाहिले जाणार आहेत.

इकलौती कोरोना वैक्सीन जो सफल हो सकती है इस साल, भारत में भी हो रहा उत्पादन

या लसीच्या मोठ्या प्रमाणावरील परिक्षणासाठी इटलीतील रोममधील एटवेंट कंपनी लस तयार करत आहे. रिपोर्टनुसार AZD1222 लसीसाठी युरोपातील देश ऑक्सफोर्ड युनिव्हरसिटीसमोर रांगेत उभे असल्याच म्हटलं जात आहे. मागच्या आठवड्यात इटली, जर्मनी, फ्रांन्स आणि नेदरलँडने ऑक्सफोर्ड लसीच्या डोसचा ४० कोटींचा  करार केला आहे. मोठ्या स्तरावरील परिक्षण यशस्वी झाल्यास सरकारी संस्थांना लसीचे लाखोंच्या संख्येत उत्पादन करण्यास परवागवी देण्यात येईल. ब्रिटेन आणि अमेरिकेने AstraZeneca या फार्मा कंपनीशी करार केले आहेत.

इटलीतील आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरंजा यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्डची लस सगळ्यात आधी तयार होऊ शकते. अन्य कोणतीही कंपनी या वर्षाच्या शेवटापर्यंत लस येण्याची शाश्वती देऊ शकत नाही. सध्या जगभरात १०० पेक्षा जास्त कंपनी कोरोनाच्या लसीवर काम करत आहेत. WHOने दिलेल्या माहितीनुसार ११ लस निर्मीती करत असलेल्या कंपन्या परिक्षण करत आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हरसिटीच्या लसीचे परिक्षण अंतिम ट्प्प्यात आहे. असेही WHO च्या तज्ज्ञांन सांगितले.

International yoga day 2020: आजाारांचं कंबरडं मोडतील योगासनं; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल वेगाने

चिंता वाढली! टॉयलेटसीट सुद्धा ठरू शकते कोरोना संसर्गाचं कारणं; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : Oxford university coronavirus vaccine europe supports india manufacturers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.