CoronaVirus News: Preparations to defeat corona with these two drugs | खुशखबर! 'या' औषधांच्या मिश्रणाने कोरोनाचा खात्मा होणार; रोगप्रतिकारकशक्तीही वाढणार

खुशखबर! 'या' औषधांच्या मिश्रणाने कोरोनाचा खात्मा होणार; रोगप्रतिकारकशक्तीही वाढणार

भारतात कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी पहिल्यांदाच दोन औषधांचे मिश्रण करून औषध तयार केले जाणार आहे.  जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोना व्हायरसबाबत अनेक देशांमध्ये प्रयोग सुरू असले तरी भारतात अशा औषधांवर प्रयोग करण्यात येणार आहेत. ज्यामुळे फक्त व्हायरस नष्ट होणार नाही. तर रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढेल.

हैद्राबादच्या एका फार्मा कंपनीच्या मदतीने मेदांता रुग्णालयात कोरोना रुग्णांवर हे प्रयोग केले जाणार आहेत. या औषधाच्या चाचणीबाबत परवागनी घेण्याकरीता सीएसआयआरने  (ड्रग कंट्रोलर ऑफ इंडीया) डीसीजीआयकडे निवेदन पाठवले आहे. परवानगी मिळाल्यानंतर हे परिक्षण दोन महिन्यांपर्यत सुरू असेल.  या परिक्षणाचे अहवाल डीसीजीआयकडे दिले जातील.

सहा औषधांच्या समुहांवर हे काम असणार आहे. आतापर्यंत कोरोनाला हरवण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याकडे जास्त भर दिला जात होता. पण आता कोरोनाला नष्ट करण्यासाठी दोन औषधांच्या मिश्रणावर काम केले जाणार आहे. प्रत्येक समुहात दोन औषधांचा समावेश आहे. त्यातील एकाचा वापर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तर  इतर औषधाचा वापर कोरोना व्हायरसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी केला जाणार आहे.

सीएसआयआरचे प्रमुख  डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले की, औषधांचे मिश्रण तयार करून त्यांचे परिक्षण केले जाणार आहे. त्यातील एक औषध व्हायरसला शरीरातून नष्ट करण्याासाठी परिणामकारक ठरू शकेल तर दुसरे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याासठी प्रभावी ठरेल. फेविपिराविर, अरबिडोल आणि लेप्रोसी वॅक्सीन एमडब्ल्यू या तीन औषधांवर सध्या काम सुरू आहे. 

भारतात आधीपासूनच एमडब्ल्यू औषधावर परिक्षण सुरू आहे. या औषधांचा दोन ते तीन दिवसात परिणाम दिसू शकतो.  सीएसआयआरचे तज्ज्ञ गेल्या काही महिन्यांपासून या विषयावर रिसर्च करत आहेत. आपातकालीन स्थितीत कोरोना रुग्णांना फेविपिराविर हे औषध देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.  या जपानी कंपनीच्या औषध निर्मीतीसाठी भारतातील ग्लेनमार्कला परवागनी देण्यात आली आहे. या औषधाची किंमत फक्त १०३ रुपये इतकी आहे. या औषधाला रुग्णालयांना आपातकालीन स्थितीत  वापरासाठी  परवानगी आहे. 

मोबाईल आणि लॅपटॉपमुळे 'या' अवयवांना बसत आहे सगळ्यात जास्त फटका; वेळीच सावध व्हा

....तर कोरोनाचे रौद्र रुप लवकरच दिसणार; कोरोना विषाणूंबाबत WHO चं मोठं विधान 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Preparations to defeat corona with these two drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.