CoronaVirus News : Pfizer pilot delivery programme in four us states at science | दिलासादायक! 'या' देशात फायजरच्या कोरोना लसीचे वितरण होणार; ४ राज्यात सुरूवात

दिलासादायक! 'या' देशात फायजरच्या कोरोना लसीचे वितरण होणार; ४ राज्यात सुरूवात

लोकांना कोरोनाची लस मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी फायजर कंपनीने प्रायोगिक तत्वावर एक प्रोजेक्ट सुरू केला आहे. या अंतर्गत फायजर कंपनी अमेरिकेतील चार राज्यांमध्ये लसीची डिलिव्हरी करणार आहे. औषध कंपनीला अल्ट्रा कोल्ड स्टोरेजच्या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी योजना तयार केली जाणार आहे. फायजर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार  कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ही लस  ९० टक्के परिणामकारक ठरणार आहे.

या लसीला कुठेही नेण्याासाठी मायनस ७० डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्यकता असणार आहे. सामान्य लसीच्या साठवणूकीसाठी २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते. फायजरने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार या प्रोजेक्ट अंतर्गत अमेरिकेतील अन्य राज्य तसंच आंतरराष्ट्रीय समुदायांना शिकवण मिळणार आहे. यामुळे त्यांच्याकडूनही याची तयारी केली जाऊ शकते. 

फायजर औषध तयार करणारी कंपनी आपल्या लसीचे वितरण रोडे आयलँड, टेक्सास, न्यू मेक्सिको आणि टेनेसीमध्ये करणार आहे. या राज्यांमध्ये इम्यूनाइजेशन स्ट्रक्चर, आकार, रुग्णांची संख्या आणि ग्रामीण भागात लस पोहोचण्याच्या आधारावर तयारी केली जाणार आहे. या राज्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत लवकर लस पोहोचणार आहे. 

कंपनीला विश्वास आहे की इमरजेंसी यूज ऑथरायजेशननंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लसीचा सेफ्टी डाटाचे योग्य आकडे मिळवण्यात मदत होईल. त्यानंतर वितरण आणि लसीकरणाची तयारी केली जाणार आहे. फायजर कंपनीने बायोएनटेक कंपनीसह १४ हजार  ५१६ कोटी रुपयांचा करार केला आहे. जेणेकरून  १० कोटी लसींचे डोसचे वितरण केले जाईल. अमेरिकन सरकारकने  ५० कोटी अतिरिक्त डोज मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. फुफ्फुसांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील उत्तम; वाचा डायटिशियन्सचा सल्ला

दरम्यान मॉडर्ना कंपनीने क्लिनिकल ट्रायलच्या अंतरिम डेटाच्या आधारावर दिलेल्या माहितीनुसार ही लस ९४.५ टक्के परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. या लसीला ३० दिवसांपर्यंत सामान्य फ्रिजच्या तापमानात ठेवलं जाऊ शकतं. मॉर्डनाच्या लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या एकूण ९५ रुग्णांच्या विश्लेषणातून दिसून आलं की, ११ लोक कोरोनाने गंभीर स्वरूपात आजारी होते.

या सगळ्या रुग्णांना लसीऐवजी प्लेसबो देण्यात आले होते. मॉडर्ना कंपनी अमेरिकन सरकारच्या ऑपरेशन वार्ड स्पीड प्रोग्रामचा हिस्सा आहे. मॉर्डना कंपनी या वर्षी ३ कोटी डोसचा पुरवठा अमेरिकेला करू शकते. कंपनी २०२१ मध्ये अमेरिका आणि जगभरातील अन्य भागात लसीचे ५० कोटी ते १ अब्ज डोजचे उत्पादन करण्याची आशा करत आहे. CoronaVirus News: ...तर अवघ्या ३० सेकंदांत होणार कोरोनाचा खात्मा; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Pfizer pilot delivery programme in four us states at science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.