शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus : भय इथले संपत नाही! आता फ्रान्समध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन; २४ तासात ४ हजार रूग्ण समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:49 PM

CoronaVirus News & Latest Updates : आधीच्या स्ट्रेनच्या तुलनेत जास्त संक्रामक असून गंभीर स्वरूपाचं संक्रमण या व्हायरसच्या माध्यमातून पसरू शकतं. लानियन रुग्णालयात कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आढळला आहे. 

कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा हात पाय पसरायला सुरूवात केली आहे. फ्रांसमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला अूसन त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांनी सोमवारी कोरोनाचा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती दिली. सुरूवातीच्या विश्लेषणातून दिसून आलं की, कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीच्या स्ट्रेनच्या तुलनेत जास्त संक्रामक असून गंभीर स्वरूपाचं संक्रमण या व्हायरसच्या माध्यमातून पसरू शकतं. लानियन रुग्णालयात कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आढळला आहे. 

फ्रासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, ''कोरोना व्हायरसने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या मागच्या २४ तासात कमालीची वाढली असून एका दिवसात  ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. २०२० मधील एकाच दिवशी सगळ्यात जास्त रुग्णांची संख्या समोर आली आहे.''

आरोग्य मंत्रालयाच्या  जियोडेस वेबसाईटवर रविवारी  रुग्णालयात ३३३ कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत सुचना दिली आहे. फ्रांसमध्ये आतापर्यंत ९०, ७६२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याच्याच्या तुलनेतच या आढवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून राजधानीच्या भागात कमी ताण येण्यासाठी रुग्णांना इतर  ठिकाणी हलवलं  जात आहे.

आरोग्य मंत्रालयानं सोमवारी ६ हजार ४७१ नवीन कोरोना रुग्णांची संख्या नमूद केली आहे. संक्रमण रोखण्यासाठी फ्रान्स सरकारकडून लसीकरण प्रक्रिया वेगानं केली जात आहे.  ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही अशी रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर आता अधिक सावधगिरी बाळगली जात आहे.

कोरोनाची लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह का आणि कशी येते

कोरोनाची लस साधारणपणे १० ते १२ महिन्यात तयार केली. कोणत्याही लस निर्मितीसाठी जवळपास चार ते पाच वर्ष लागतात. कोरोनाची लस तयार करण्यासाठी फारसा वेळ  हातात नव्हता. कारण कोरोनाच्या उद्रेकानं सर्वत्र थैमान घातलं होतं.  त्यामळेच या लसीची कार्यक्षमता १०० टक्के नसून कोविशिल्डची कार्यक्षमता फक्त ६२ टक्के आहे. कोवॅक्सिनच्या शेवटच्या टप्प्याताली चाचणीतील माहिती अजूनही समोर आलेली नाही.  ही लस  ८२ टक्के परिणामकारक ठरत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह येण्याचं सगळ्यात मोठं कारण कोरोनाचा बदलता स्ट्रेन हे असू शकतं.  दक्षिण आफ्रिका, युके, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनशी लढण्यासाठी भारतीय लस कितपत प्रभावी ठरू शकते याबाबत शंका आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर तीन महिने तसंच बारा आठवड्याचे असू शकते.  आपल्याकडे दोन डोसमध्ये चार आठवड्याचे अंतर ठेवायला सांगितले जात आहे. यामुळे देखील चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्

लस घेतली म्हणजे आपण कोरोनापासून बचावलो आणि आता कोरोनाचा  धोका नाही. असा गैरसमज अनेकांचा झाला आहे. त्यामुळे लोक मास्कच्या वापराबाबत जागरूक नाहीत. सोशल डिस्टेंसिंग पाळलं जात नाहिये, सॅनिटायझर वापरण्याचं प्रमाण कमी झालंय. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लस