CoronaVirus News : Method for checking quality of face mask on corona at home | खरंच तुमच्या मास्कने कोरोना संसर्गापासून होतोय बचाव? घरच्याघरी 'ही' ट्रिक वापरून तपासा

खरंच तुमच्या मास्कने कोरोना संसर्गापासून होतोय बचाव? घरच्याघरी 'ही' ट्रिक वापरून तपासा

कोरोनाच्या माहामारीमुळे जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. कोरोनाची लागण होईल या भीतीने सर्वजण जागरूकता बाळगताना दिसून येत आहे. मास्कचा वापर, सॅनिटायजरचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करत आहे. दुसरीकडे संक्रमितांचा आकडा वाढत आहे. अशा स्थितीत मास्क संसर्गापासून बचाव करण्याासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. तुम्ही वापरत असलेला मास्क खरंच कोरोना संक्रमणापासून  बचाव करतोय का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

घरच्याघरी सोप्या पद्धतीनं चाचणी करून तुम्ही वापरत असलेला मास्क कितपत सुरक्षित आहे हे पाहू शकता.  मेणबत्तीच्या साह्यायानं तुम्ही मास्कची तपासणी करू शकता. सगळ्यात आधी कापड आणि कोरोना विषाणूंच्या आकाराबाबत कल्पना असायला हवी. तुम्ही वापरत असलेल्या कापडाचा दर्जा कसा आहे. यावर व्हायरसपासून बचाव होईल का हे अवलंबून असते. कोणतंही कापड तयार केलं जातं तेव्हा धाग्यांचा वापर केला जातो.

या कपड्यात आपल्याला काही छिद्रे दिसतात. या छिद्रांचा आकार 1 मिलीमीटर ते 0.1 मिलीमीटर इतका असतो. आपण ज्या जीवघेण्या विषाणूंचा  सामना करत आहोत तो विषाणू या आकारापेक्षा हजारपटीने लहान आहे. म्हणून डोळ्यांना हा विषाणू दिसत नाही. म्हणजेच अशा कापडातून विषाणू सहजगत्या प्रवेश करू शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मास्कचा वापर हा 0.08 मायक्रोमीटर्स असावा.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी घरी तयार केलेल्या मास्कचा वापर फायदेशीर ठरेल. मास्क तयार करताना सुती कापडाचा वापर करा. साधारणपणे हा मास्क बनवताना त्यात किमान 4 ते 5 लेयर ठेवा. जर  दुकानातून मास्क खरेदी करत असाल  तर तो 4 ते 5 लेयरचा आहे का याची खात्री करून मगच घ्या.

मेणबत्तीच्या साहाय्याने तुम्ही चाचणी करून पाहू शकता.

मास्क कितपत सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी सगळ्यात आधी मेणबत्ती पेटवा. तोंडाला मास्क लावून फुंकर मारत ती मेणबत्ती विझवण्याचा प्रयत्न करा. मास्क मधून हवा बाहेर पडून मेणबत्ती विझली तर समजून जा की तुमचा मास्क  कोरोनापासून बचाव करू शकत नाही.  मेणबत्ती विझली नाही तर मात्र तुम्ही निश्चिंत होऊन तो मास्क वापरू शकता. कारण असा मास्क कोरोना विषाणूंपासून तुमचा बचाव करू शकेल.

मास्क मधून हवा बाहेर पडते आहे. म्हणजेच बाहेरील हवा व त्यातील विषाणू सुद्धा मास्क मध्ये येऊ शकतात.  तेथून थेट तोंडात प्रवेश करू शकतात. त्यामुळे अशा मास्कचा वापर टाळायला हवा. या पद्धतीला कोणतेच वैज्ञानिक प्रमाण नाही. पण तुमच्या मास्क मधून हवा बाहेर जात असेल तर जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा बाहेरील संक्रमित हवा त्या मास्क मधून आत सुद्धा येऊ शकते. असा मास्क तुम्हाला संक्रमित करू शकतो. म्हणून या पद्धतीने तपासणी केल्यास संसर्गापासून लांब राहता येऊ शकतं. 

खुशखबर! कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...

पावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Method for checking quality of face mask on corona at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.