CoronaVirus News : गॅस पास केल्यामुळे कोरोना विषाणूंचं संक्रमण होतं? जाणून घ्या रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 17:02 IST2020-05-12T16:55:56+5:302020-05-12T17:02:25+5:30
कोरोना विषाणू गॅस पास केल्यामुळे पसरू शकतो का? यावर बीजींगमधील तज्ञांनी माहिती दिली आहे.

CoronaVirus News : गॅस पास केल्यामुळे कोरोना विषाणूंचं संक्रमण होतं? जाणून घ्या रिपोर्ट
कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन संसर्गाद्वारे निरोगी व्यक्तीला सुद्धा होऊ शकतं.
यासाठी सोशल डिस्टेंसिंग आणि साफ-सफाईकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर या आजारांबाबत अनेक अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. सध्या एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. तो म्हणजे गॅस पास केल्यामुळे म्हणजेच पादल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते का? आज आम्ही तुम्हाला याबाबत अधिक माहिती देणार आहोत.
कोरोना व्हायरसचा प्रसार हवेमार्फत होत नाही. WHO ने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रसार हवेमार्फत होत नसून एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समुळे हा आजार पसरत जातो. कारण ड्रॉपलेट्सचं वजन असल्यामुळे हवेमार्फत प्रसार होऊ शकतं नाही. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणून हात पाय स्वच्छ धुणं गरजेच आहे. (शरीरातील विषारी पदार्थ बाहेर न पडल्याने उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या, जाणून घ्या लक्षणं)
कोरोना व्हायरस गॅस पास केल्यामुळे पसरू शकतो का? यावर बीजींगमधील तज्ञांनी माहिती दिली आहे. रिपोर्टसुद्धा देण्यात आले आहेत. जर कोरोना व्हायरसची लागण झालेला एखादा रुग्ण गॅस सोडत असेल तर त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. पण CDC ने दिलेल्या रिपोर्टनुसार गॅस (Farts) कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्याचं कारण ठरू शकत नाही. कारण कोरोना संक्रमीत व्यक्तीची पॅण्ट दुसरा व्यक्ती जोपर्यंत घालणार नाही तोपर्यंत संक्रमणाचा धोका नसतो. कारण त्यावेळी पॅण्ट व्हायरस निवारक मास्कची भूमिका निभावत असते. सध्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोणतंही औषध किंवा लस शोधण्यात आलेली नाही. कोरोनाला रोखण्यासाठी विविध देशांतील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.
(CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल)