शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

CoronaVirus attacking kidneys : आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 17:06 IST

CoronaVirus News & Latest Updates : एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे रूग्णाच्या किडनीला नुकसान पोहोचत आहे.

धोकादायक कोरोना व्हायरसचा (CoronaVirus) उदय पुन्हा एकदा भारताच्या बर्‍याच भागात दिसून येत आहे. गेल्या एका वर्षापासून जगभरात हाहाकार पसरवणारा हा व्हायरस एक सामान्य श्वसन विषाणू असल्याचे मानले गेले होते, परंतु काही काळातच ही गृहितकं चुकीची ठरली. आता, एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे रूग्णाच्या किडनीला नुकसान पोहोचतआहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि फुफ्फुसांवर कोविड १९ चा परिणाम स्पष्ट आहे. दरम्यान, त्यांनी असा इशारा दिला आहे की, किडनीच्या समस्येने ग्रस्त कोविड -१९ रूग्णांनी अत्यंत जागरूक राहणे आवश्यक आहे, अन्यथा ते त्यांच्या किडनीला अधिक हानी पोहोचवू शकते. कोविड -१९ मध्ये संसर्ग झालेल्या लोकांना किडनीचे नुकसान किंवा किडनीचे कमी, जास्त तीव्रतेचे आजार होण्याचा धोका असतो.

अल्पकालीन किडनीच्या आजारात काही तास किंवा काही दिवसात अचानक नुकसान होते. यामुळे रक्तामध्ये टाकाऊ पदार्थांचे साठवण होते ज्यामुळे किडनीला शरीरात योग्य प्रमाणात द्रवपदार्थ ठेवणे अवघड होते. रक्तातील कचरा जास्त जमा झाल्यामुळे रक्ताच्या रासायनिक क्रियेवर परिणाम होतो. त्याचा परिणाम मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांसारख्या इतर अवयवांवरही होतो.

नवी दिल्लीतील  फोर्टिस हॉस्पिटलमधील दीपक कालरा आयएनएसला सांगितले की, "कोविड -१९ चा संसर्ग गंभीर असलेल्या प्रकरणांमध्ये किडनीचा आजार दिसून येत आहे. त्याव्यतिरिक्त अल्पकालीन किडनीचे नुकसान झालेले सुमारे १० ते २० टक्के रूग्ण रूग्णालयात दाखल होत आहेत. " अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजीच्या क्लिनिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे नमूद करण्यात आले आहे की कोविड -१९ च्या रूग्णांमध्ये अल्पकालीन किडनीच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. श्री बालाजी एक्शन मेडिकल इंस्टीट्यूट ऑफ नवी दिल्ली येथील राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाचा हल्ला थेट शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर होतो. त्यानुसार आजाराची तीव्रताही वाढत जाते.  

प्रतिबंध 

किडनी आजार होऊ नये यासाठी करावयाच्या दोन प्रमुख उपाययोजना म्हणजे रक्तातील शर्करा आणि रक्तदाब यांच्यावर नियंत्रण राखणे. काही औषधे देखील किडनी आजारांना कारणीभूत ठरतात.  वेदनाशामक औषधे तसेच काही आयुर्वेदिक व हर्बल उत्पादनांनी देखील किडनीचे नुकसान होऊ शकते.  डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याखेरीज अशी औषधे अजिबात घेऊ नयेत. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

किडनी आजारावरील सर्वसामान्य उपचारांमध्ये किडनीचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या कारणावर नियंत्रण ठेवणे आणि उपचार करणे, योग्य पोषक आहार, किडनी आजार कोणत्या टप्प्यावर आहे त्यानुसार प्रोटीन सेवन यांचा समावेश असतो.  अशा रुग्णांनी खारट आणि खूप जास्त प्रोटीन असलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे.  त्याचप्रमाणे ज्यामध्ये फॉस्फेट जास्त प्रमाणात असते म्हणजे बिया, दाणे, सुकवलेले वाटाणे, बीन्स, चीज असे पदार्थ प्रमाणातच खावेत. दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधनExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला