CoronaVirus News: लवकरच कोरोनाचा गेम ओव्हर? शास्त्रज्ञांनी शोधलं स्वस्त अन् मस्त 'गुप्त हत्यार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:12 IST2021-05-28T16:08:54+5:302021-05-28T16:12:20+5:30
CoronaVirus News: कोरोनावर मात करण्यासाठी साधी सोपी अन् सुलभ उपचार पद्धती; महत्त्वाचं संशोधन

CoronaVirus News: लवकरच कोरोनाचा गेम ओव्हर? शास्त्रज्ञांनी शोधलं स्वस्त अन् मस्त 'गुप्त हत्यार'
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होऊ लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचं काम सुरू आहे. याशिवाय लवकरच भारतात नेजल स्प्रे उपलब्ध होईल. यानंतर आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपचार पद्धत शोधून काढली आहे.
कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा
कोरोनाला हरवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवा उपाय शोधून काढला आहे. कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटी-कोविड नॅनोबॉडीज सोडून त्या माध्यमातून कोरोनाचा खात्मा करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधली आहे. विशेष म्हणजे यामध्ये रुग्णाला केवळ अँटीबॉडी नाकावाटे शोषून घ्याव्या लागतील. म्हणजेच श्वासावाटे नॅनोबॉडीज शरीरात जातील. सर्दी झाल्यावर आपण इलहेलर वापरतो. तीच पद्धत यामध्ये वापरण्यात आली आहे. ही उपचार पद्धत कोरोनाविरोधात गुप्त हत्यार म्हणून काम करेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे कोरोनाचे स्पाईक प्रोटिन नष्ट होतील. त्यामुळे कोरोना पसरण्याची प्रक्रिया निष्क्रिय होईल.
Covaxin च्या ६ कोटी लसींचे उत्पादन; राज्याला केवळ २ कोटींचा पुरवठा, आकडेवारीत तफावत!
युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी नव्या उपचार पद्धतीचा शोध लावला आहे. संशोधकांनी अँटी-कोविड नॅनोबॉडीजचा प्रयोग हॅमस्टर नावाच्या प्राण्यावर करून पाहिला आहे. हॅमस्टर उंदरांच्या प्रजातीमधील एक जीव आहे. नव्या उपचार पद्धतीत नॅनोबॉडीज एखाद्या मोनोक्लोनल एँटीबॉडीजसारखं काम करतात.
नॅनोबॉडीजचा वापर कर्करोगावरील उपचारातही केला जातो. त्यांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो. त्यामुळे त्यांच्या उत्पादनासाठी येणारा खर्चदेखील कमी असतो. जागतिक स्तरावर नॅनोबॉडीजचा वापर केला जाऊ शकतो. भविष्यात येणाऱ्या अनेक आजारांशी लढण्यातही नॅनोबॉडीज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सायन्स ऍडव्हान्सेस जर्नलनं २६ मे २०२१ रोजी या संशोधनाबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.