Covaxin च्या ६ कोटी लसींचे उत्पादन; राज्याला केवळ २ कोटींचा पुरवठा, आकडेवारीत तफावत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:37 PM2021-05-28T15:37:02+5:302021-05-28T15:38:08+5:30

Covaxin: एका आकडेवारीनुसार यात मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

puzzle on covaxin 6 crore shots ready 2 crore given to state as per official data | Covaxin च्या ६ कोटी लसींचे उत्पादन; राज्याला केवळ २ कोटींचा पुरवठा, आकडेवारीत तफावत!

Covaxin च्या ६ कोटी लसींचे उत्पादन; राज्याला केवळ २ कोटींचा पुरवठा, आकडेवारीत तफावत!

Next
ठळक मुद्देकोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन आणि पुरवठा आकडेवारीत तफावतराज्यांना २ कोटींचे डोस पुरवल्याची आकडेवारीलसीकरण सुरू करण्यापूर्वीच २ कोटींचा साठा

नवी दिल्ली: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे समोर आल्यानंतर जागतिक स्तरावर कोरोना लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. भारतातही कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. त्यावर उत्पादन वाढवण्याची तयारी कंपन्यांनी दाखवली आहे. मात्र, एका आकडेवारीनुसार यात मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोव्हॅक्सिनचे ६ कोटी लसींचे डोस तयार झाले असून, राज्यांना मात्र केवळ २ कोटी डोसचा पुरवठा करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. (puzzle on covaxin 6 crore shots ready 2 crore given to state as per official data)

कोरोना लसीच्या तुटवड्यावरून केंद्र आणि विविध राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोरोना लसींच्या अभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद पडल्याची माहिती मिळाली. आता मात्र, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन आणि पुरवठा याच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात भारत बोयोटेक कंपनीकडून स्पष्टीकरण आलेले नाही.

Yaas चक्रीवादळ: बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार; अधिकारींना निमंत्रण दिल्याने नाराज

राज्यांना २ कोटींचे डोस पुरवल्याची आकडेवारी

अधिकृत आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत कोव्हॅक्सिनचे दोन कोटी १० लाख डोस देण्यात आले होते. त्यामध्ये निर्यातीसाठीच्या लसींचाही आकडा मोजण्यात आला आहे. भारत बायोटेकने २० एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये दीड कोटी डोस तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तसेच एप्रिल महिन्यासंपेर्यंत दोन कोटी डोस निर्माण केले जातील असेही सांगण्यात आले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा एल्ला यांनी मे महिन्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या लस उत्पन्नाचा आकडा तीन कोटींवर पोहचेल, असे म्हटले होते. 

“हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका

लसीकरण सुरू करण्यापूर्वीच २ कोटींचा साठा

देशातील लसीकरण मोहीम सुरू होण्याआधी ऐल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीनेकडे लसीकरण सुरू करण्याआधीच दोन कोटी लसींचा साठा उपलब्ध होता. या लसींचाही विचार केला तर एकूण लसींची संख्या ही साडेतास कोटींवर जाते. या साडेसात कोटींमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीच्या लस उत्पादनाची आकडेवारीचाही विचार केला तर एकूण लसींचा हिशोब आठ कोटींच्या आसपास जातो. 

नवे नियम सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठीच, युझर्सनी घाबरू नये: रविशंकर प्रसाद

काही लसी देशाबाहेर निर्यात

यापैकी कोव्हॅक्सिनच्या काही लसी डिप्लोमसीअंतर्गत देशाबाहेर निर्यात करण्यात आल्या. मात्र, भारताने एकूण ६ कोटी ६० लाख लसींचे डोस परदेशात पाठवले. यात सर्वाधिक डोस हे कोव्हिशील्ड लसीचे होते. त्यामध्ये कोव्हॅक्सिनचे डोस हे २ कोटी इतके होते असे मानले तर देशात सध्या ६ कोटी लसी उपलब्ध असायला हव्यात. मात्र दोनच कोटी लसी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. यामधून चार कोटी डोसचा हिशोब स्पष्ट होत नसल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: puzzle on covaxin 6 crore shots ready 2 crore given to state as per official data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.