CoronaVirus News : Does really corona virus is spread slowly in summer | काळजी वाढली! उन्हाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढणार की कमी होणार?; तज्ज्ञ म्हणाले की.....

काळजी वाढली! उन्हाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढणार की कमी होणार?; तज्ज्ञ म्हणाले की.....

देशात पुन्हा एकदा वेगानं कोरोनाचा प्रसार होत असल्यामळे सगळ्यांमध्येच चिंतेचं वातावरण पसरलं आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षीचा अनुभव पाहता गरमीच्या वातावरणातही कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. याशिवाय कोरोना संक्रमणात वाढ होण्याचीही शक्यता आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या कोविड टास्क फोर्स ऑपरेशन ग्रुपचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी कोरोनाच्या प्रसाराबाबत बोलताना सांगितले की, ''व्हायरसशी संबंधित सर्व आजार लाटांप्रमाणेच आहेत. त्यांचा हवामान किंवा काळाशी काही संबंध नाही. मागच्या वर्षी कोरोनानं जेव्हा मान वर काढली होती तेव्हा असं सांगितलं जात होतं की,  उन्हाळा सुरू होताच प्रसारामध्ये कमी येईल. मात्र, प्रत्यक्षात उलट घडले.''  यानंतर असं सांगितलं जात होतं, की हिवाळ्यात प्रकरणं वाढू शकतात, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे   या विषाणूचा उष्णता किंवा थंडीशी काहीही संबंध नाही. तो एका लाटेच्या रुपात पसरत आहे.

कोरोनाच्या संसर्गात पुन्हा वाढ होण्याचं आणखी एक कारण म्हणजे कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर आणि लस आल्यामुळे लोकांनी काळजी घेणं सोडून देत सर्रास बाहेर फिरण्यास सुरुवात केली. लस घेण्यापूर्वी कोरोनामुळे कोणताही धोका उद्भवू शकत नाही असा विचार केल्यामुळे लोक घराच्या बाहेर जायला लागले ही बाब चिंताजनक असून कोरोनाच्या प्रसाराचे कारण ठरली आहे. 

काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

डॉ. एन के अरोरा यांनी पुढे सांगितले की, ''गेल्या अनेक दिवसांपासून विविध राज्यामध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन केल जात नाहीयेत. मास्कच्या वापराबाबतही लोक निष्काळजीपणा करताना दिसून येत आहेत.  यामुळे ही बाब चिंताजनक ठरत आहे. परिणामी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.''  

चिंताजनक! देशात समोर आला कोरोनाचा नवा स्ट्रेन; व्हायरसच्या जुन्या रुपापेक्षा वेगळी आहेत ७ लक्षणं

दरम्यान कोरोनाविरोधात आता लोकांना लसीऐवजी गोळ्या देण्यात येऊ शकतात. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे तज्ज्ञ यावर काम करत आहेत. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेका लसीच्या चीफ डेव्हलपर सारा गिल्बर्ट यांनी साँगितले की, त्यांनी इंजेक्शन फ्री डोस तयार करण्यावर काम सुरू केले आहे. डेली मेल या ब्रिटीश वृत्तपत्रात याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले आहे.

या संशोधनाबाबत गिल्बर्ट यांनी हाऊस ऑफ कॉमन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिटीसमोर सांगितले की, नेजल स्प्रेच्या माध्यमातून फ्लूवरील अनेक लसी दिल्या जातात. आता आम्ही अशाचप्रकारे काम करणारी कोरोना लस विकसित करण्यासाठी संशोधन करत आहोत. तसेच तोंडाच्या माध्यमातून लसीचे डोस देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे ज्यांना इंजेक्शनबाबत समस्या आहेत, असे लोक टॅबलेटच्या माध्यमातून डोस घेऊ शकतील.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Does really corona virus is spread slowly in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.