चिंताजनक! समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; कोरोना रुग्णाची बोटं काळी पडल्यानं कापावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 11:20 AM2021-02-14T11:20:41+5:302021-02-14T11:30:14+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांपैकी  ३० टक्के रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याची प्रकरणं दिसून आली.

CoronaVirus News: Covid-19 positive woman doctors amputate 3 fingures | चिंताजनक! समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; कोरोना रुग्णाची बोटं काळी पडल्यानं कापावी लागली

चिंताजनक! समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; कोरोना रुग्णाची बोटं काळी पडल्यानं कापावी लागली

Next

कोरोना व्हायरसचं संकट अजूनही कमी होताना दिसून येत नाही. अनेक देशांमध्ये अजूनही कोरोनाचा वेगानं प्रसार होत आहे.   शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसच्या वेगवेगळ्या रुपांवर संशोधन करत आहे. दरम्यान कोरोनाच्या लक्षणांबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इटलीमधील 86 वर्षीय महिलेची ही काळी पडलेली बोटं कापावी लागली आहेत. युरोपियन जर्नल ऑफ व्हॅस्क्युलर आणि एन्डोव्हॅस्कुलर सर्जरी (Journal of Vascular and Endovascular Surgery) या वैद्यकीय जर्नलमध्ये याचे फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत.

इटलीतील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या गंभीर लक्षणांमध्ये याचा समावेश होत आहे. अशाच प्रकारची लक्षणं बर्‍याच कोरोना रूग्णांमध्ये आढळून आली आहेत. यामध्ये रक्तात गुठळ्या तयार होण्याबरोबरच रक्त वाहिन्यांमध्ये अडथळे देखील निर्माण झाल्याचं समोर आले आहे. या वृद्ध इटालियन महिलेच्या उजव्या हाताचं दुसरे, चौथे आणि पाचवे बोट काळं पडले होते. पण महत्त्वाचं म्हणजे या महिलेला कोरोनाचं कोणतंही लक्षण जाणवलं नव्हतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार या महिलेच्या बोटांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानं तिच्या रक्तप्रवाहात बाधा निर्माण झाली होती. 

मिररच्या रिपोर्टनुसार, मार्च महिन्यात या महिलेला अक्यूट कोरोनरी सिंड्रोम असल्याचे दिसून आलं होत. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाला होता. त्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानं संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाहसुद्धा कमी झाला होता. पेशी खराब झाल्यानंतर रक्तवाहिन्या खराब झाल्या. त्यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणेत सायकोटाईन स्टॉर्म तयार झाले. यामुळे रक्तदाब कमी होऊन रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात. 

मार्चमध्ये या महिलेच्या हृदयाला रक्त पुरवठा कमी होऊ लागल्यानंतर डॉक्टरांनी औषधं दिली होती. परंतु त्यानंतर महिला कोरोना संक्रमित आढळून आली. पण कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. महिन्याभरानंतर या महिलेच्या शरीरामध्ये ड्राय गँगरीन आढळून आल्यानंतर तिच्या उजव्या हाताची बोटं काळी पडायला सुरूवात झाली. डॉक्टरांच्या तपासणीनंतर या महिलेच्या धमन्यांमध्ये रक्तदाब कमी  झाल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करत बोटं कापण्याचा निर्णय घेतला. 

सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चचे प्रोफेसर ग्रॅहान कुके यांनी सांगितलं  की, ''कोरोना खूपच वेगळा आजार आहे. इतर विषाणूजन्य आजारांपेक्षा वेगळी असणारी त्याची वैशिष्ट्ये ही एक जास्त हायपरकोग्लेबल अवस्था आहे, ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या आवश्यकतेपेक्षा जास्त असतात. '' अनेक कोरोना रुग्णांच्या शरीरात डॉक्टरांना रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचं आढळलं आहे.

दिलासादायक! कोवॅक्सिन, कोविशिल्डनंतर आता गेमचेंजर ठरतोय नेझल स्प्रे; कोरोनाचा होणार खात्मा

दरम्यान, डेली मेलच्या वृत्तानुसार लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील प्रोफेसर रूपेन आर्य यांच्या मते मे महिन्यातील कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांपैकी  ३० टक्के रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याची प्रकरणं दिसून आली. याचबरोबर कोरोना संक्रमणामध्ये थ्रोम्बोसिस (Thrombosis) ही एक मोठी समस्या असल्याचं दिसून आलं आहे.
 

Web Title: CoronaVirus News: Covid-19 positive woman doctors amputate 3 fingures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.