CoronaVirus News : Coronavirus brazil warns women to delay pregnancy amid covid-19 surge | CoronaVirus News : शक्य असल्यास महिलांनी गर्भधारणा पुढे ढकलावी; कोरोना उद्रेकाच्या भीतीनं ब्राझील सरकारचं आवाहन

CoronaVirus News : शक्य असल्यास महिलांनी गर्भधारणा पुढे ढकलावी; कोरोना उद्रेकाच्या भीतीनं ब्राझील सरकारचं आवाहन

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा  थैमान घातलं आहे. कोरोनाचा  कहर कधी कमी होईल. याबाबत कोणालाही काही कल्पना नाही. अशातच दिवसेंदिवस धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. मृत्यूचा धोका टाळण्यासाठी तसंच महिला आणि लहान मुलांचा विचार करता ब्राझिलच्या सरकारनं पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे.  ब्राझिलमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची टंचाई जाणवत आहे तसेच बेड्सही अपुरे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांनी शक्य असल्यास आपली गर्भधारणा एक किंवा दोन वर्षासाठी पुढे ढकलावी असं आवाहन ब्राझील सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. 

ब्राझीलमध्ये कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळत असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या देशात बेड्स आणि औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ब्राझीलने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची याचना केली आहे. कोरोनाचे संकट गंभीर, जीवघेणे आहे तोपर्यंत महिलांनी आपली गर्भधारणा पुढे ढकलावी असं आवाहन ब्राझील सरकारने केले आहे. 

भारताच्या तुलनेत ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक कोरोनाला बळी पडली असून त्या देशाची अत्यंत वाईट अवस्था झाल्याचं दिसून येतंय. इतर देशांचा विचार करता ब्राझीलमध्ये कोरोनोमुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे.  एकूण लोकसंख्येचा विचार करता ब्राझीलची अवस्था भारतापेक्षा कितीतरी वाईट आहे.

काय आहे हेमोफीलिया, या आजाराच्या नावानं लोक का घाबरतात?

 शनिवारी (17 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,34,692 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,75,649 वर पोहोचला आहे. कोरोना झाल्यास लवकर बरं होण्यासाठी घरीच कशी घ्याल काळजी?; वाचा काय खायचं काय नाही

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Coronavirus brazil warns women to delay pregnancy amid covid-19 surge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.