भय इथले संपत नाही! चीनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 16:39 IST2021-01-01T16:04:26+5:302021-01-01T16:39:45+5:30
CoronaVirus News & Latest Updates : २३ वर्षांची मुलगी रुग्णालयात निरिक्षणाखाली आहे. तिचे सर्व शेजारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे.

भय इथले संपत नाही! चीनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा
जगातील सुमारे दोन डझन देशांमध्ये कहर केल्यानंतर कोरोनाव्हायरसचा एक नवीन स्ट्रेन चीनमध्ये पोहोचला आहे. याची खात्री झाल्यानंतर लवकरच चीनी सरकारने सांगितले की ब्रिटनमधील हा कोरोना विषाणू अत्यंत संक्रामक आणि धोकादायक आहे. ब्रिटनहून चीनमध्ये आलेल्या 23 वर्षांच्या मुलीमध्ये कोरोनाव्हायरसचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे. चीनमधील कोरोना विषाणूचे हे पहिले प्रकरण समोर आलं आहे.
ब्रिटनमधील कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन अत्यंत संक्रामक आणि धोकादायक असल्याचे चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) जारी केले आहे. जगातील बर्याच देशांनी ब्रिटनला आणि तेथून जाण्यासाठी उड्डाणे, गाड्या आणि जहाजं थांबवली आहेत. चीनी शास्त्रज्ञांनी सांगितले की,'' ब्रिटनमधून चीनला परत आलेल्या 23 वर्षीय विद्यार्थ्यीनीत कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे. ही मुलगी 14 डिसेंबर रोजी शांघाय येथे आली होती. त्याच वेळी, तिला कोविड-१९ असल्याचे समोर आले. ज्यानंतर नवीन कोरोना विषाणू चीनमध्ये पसरल्याची खात्री झाली.''
सीडीसीने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की ब्रिटनमधील कोरोना विषाणू अत्यंत संक्रामक आणि धोकादायक आहे. चीनच्या लोकांनी यापासून दूर राहिले पाहिजे. ब्रिटिनमधील कोरोनाचा स्ट्रेन चीनमध्ये आल्यामुळे अनुवांशिक उत्परिवर्तन देखील झाले आहे. म्हणून चीन सरकारने लोकांना या विषाणूपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. कारण तो जास्त वेगाने पसरतो. चीनने ब्रिटनला जाण्यासाठी आणि तेथील सर्व उड्डाणे तत्काळ तात्पुरती थांबवली आहेत. काळजी वाढली! हिवाळ्यात दारूचं सेवन ठरू शकतं जीवघेणं; हवामान विभागाचा धोक्याचा इशारा
२३ वर्षांची मुलगी रुग्णालयात निरिक्षणाखाली आहे. तीचे सर्व शेजारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. बेल्जियम, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, आईसलँड, आयर्लंड, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, एसएआर, भारत, इस्त्राईल, जपान, जॉर्डन, लेबनॉन, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन पसरला आहे. आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती