आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती

By manali.bagul | Published: December 30, 2020 12:38 PM2020-12-30T12:38:17+5:302020-12-30T13:13:26+5:30

CoronaVirus News & Latest Updates : अमेरिकेत संक्रमितांची संख्या एक कोटी ९९ लाखांपेक्षा जास्त आहे. भारतात हा आकडा १ कोटी २ लाखांच्या वर आहे.

Coronavirus new study britain covid-19 variant coronavirus new strain | आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती

आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती

Next

जगभरात आतापर्यंत ८ कोटी २३ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १७ लाख  ९६ हजारांपेक्षा जास्त लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. भारतात सुरूवातीपासून कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. अमेरिकेत संक्रमितांची संख्या एक कोटी ९९ लाखांपेक्षा जास्त आहे. भारतात हा आकडा १ कोटी २ लाखांच्या वर आहे. आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानं चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन  ७० टक्के अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे.  ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी एक तुलनात्मक अध्ययन केलं आहे.

या अध्ययनात दिसून आलं की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे समस्या वाढू शकतात. पब्लिक हेल्थ इंग्लड द्वारे करण्यात आलेल्या या संशोधनात वैज्ञानिकांनी १,७०० पेक्षा जास्त लोकांमध्ये एक तुलनात्मक अध्ययन करण्यात आलं होतं.  यामध्ये नवीन स्ट्रेनच्या संक्रमणाबद्दल अभ्यास करण्यात आला होता. 

प्रतीकात्मक तस्वीर

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांच्या मते कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आणि जुना यांच्या संक्रमणामुळे रूग्णालयात भरती असलेल्या रुग्णांमध्ये कोणताही फरक नाही. म्हणजेच कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनने संक्रमित लोकांना गंभीर लक्षणांचा सामना करावा लागला. जितका पहिल्या व्हायरसने संक्रमित झालेल्या रुग्णांना करावा लागला होता. 

एकच मास्क धुवून वापरणं ठरू शकतं जीवघेणं; स्वस्त मास्क विकत घेताना नक्की पाहा 'या' गोष्टी 

दरम्यान वैज्ञानिकांनी या संशोधनात सांगितले की, कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन तुलनेने अधिक वेगानं पसरू शकतो. त्यामुळेच संक्रमणाच्या केसेसमध्ये वाढ झालेली पाहायला मिळू शकते. ब्रिटनमध्ये लसीकरण अभियान सुरू केलं असूनही नवीन रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झालेली पाहायला मिळाली होती. मंगळवारी संक्रमणाचे ५३ हजारांपेक्षा जास्त केसेस समोर आले होते. त्यातील ४१४ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला. 

Coronavirus: भारतात कोरोनाचा आणखी एक गंभीर साइड इफेक्ट आला समोर, डॉक्टरांनी दिला इशारा....

भारतात आतापर्यंत  २० लोक कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने संक्रमित असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. याआधी काल दिवसभरात देशाच्या विविध भागांमध्ये ६ जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. त्यातच ब्रिटनहून आलेल्या अनेक प्रवाशांशी संपर्क होत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.

Web Title: Coronavirus new study britain covid-19 variant coronavirus new strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.