शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

चिंताजनक! कोरोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन समोर येणार; वैज्ञानिकांची धोक्याची सुचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 1:16 PM

CoronaVirus News & latest Updates : व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे.

जगभरात आतापर्यंत ८ कोटी  ५५ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १८ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा सामना करावा लागला आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत वैज्ञानिकांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नायजेरियन वैज्ञानिकानं दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची अजून नवीन रुपं समोर येऊ शकतात. 

रिपोर्ट्सनुसार नायजेरियाचे वैज्ञानिक ओमिलाबू यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या कोरोनाच्या स्ट्रेनचा प्रसार होऊ शकतो असे सांगितले आहे. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आनुवांशिक विश्लेषण केलं आहे.  जेणेकरून संक्रमण पसरण्यापासून रोखता येऊ शकतं.

ओमिलाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचे नवीन स्ट्रेन सापडले आहेत.  नायजीरियामध्येही नवीन स्ट्रेन दिसून आला आहे. व्हायरसचे रूपांतर वेगळ्या स्वरूपात करणे ही एक विलक्षण गोष्ट नाही. आपल्याला मन शांत ठेवावे लागेल, कारण संक्रमणाची आणखी नवे प्रकार समोर येत आहेत.  आजार नियंत्रण व व्यवस्थापनासाठी आफ्रिका केंद्रांनी रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नायजेरियात 89,163 लोकांना कोरोना संसर्ग झाला असून त्यापैकी 1,302 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR

ओमिलाबू हे 'लागोस युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिन अँड टीचिंग हॉस्पिटल' मधील 'सेंटर फॉर ह्यूमन अँड जेनेटिक व्हायरोलॉजी' चे संचालक आहेत. ओमिलाबू म्हणतात की, ''नायजेरियात संसर्गाची नवीन प्रकरणे वाढत आहेत, परंतु इथल्या लोकांना  कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे संसर्ग झाल्याचे अद्याप कळू शकले नाही. संसर्ग देशात पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अजून संशोधन आवश्यक आहे.''

अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,40,470 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,49,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,505 नवे रुग्ण आढळले आले असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या