Coronavirus latest news new delhi launched free distribution of free mask open mask bank | अरे व्वा! 'या' शहरात मिळणार मोफत मास्क, पालिकेनं तयार केली Mask Bank

अरे व्वा! 'या' शहरात मिळणार मोफत मास्क, पालिकेनं तयार केली Mask Bank

कोरोनाने संपूर्ण जगभरात 9 ते 10 महिन्यांपासून कहर केला आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर  शस्त्राप्रमाणे केला जात आहे. या महामारीच्या स्थितीत जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत एका व्यक्तीकडून इतरांपर्यंत संक्रमण पोहोचू नये यासाठी मास्क महत्वाचा ठरत आहे. अनेक ठिकाणी मास्कचे मोफत वितरण केले जात आहे. मध्य दिल्लीतील सदर बझार भागात मास्क बँक स्थापन करण्यात आली आहे. उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश यांच्या हस्ते बुधवारी या बँकेचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

निवेदनातून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलीस आणि उत्तर दिल्ली महापालिका यांच्या सहकार्याने बारह तुती चौकात ही मास्क बँक स्थापन करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला मास्कची गरज आहे, त्यांना या बँकेतून मोफत मास्क मिळणार आहे. तसेच ज्यांना मास्क दान करायचे आहेत, ते ही इथे आणून देऊ शकतात.
 

घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय 

बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणातवर गर्दी असते. यात गरीब कामगार, व्यावसायिक, ग्राहक यांचा समावेश असतो. मास्क नसेल तर दोन हजार रुपये दंड आहे. गरीब कामगारांना इतका दंड भरणं शक्य  होत नाही.  त्यामुळे मोफत मास्क पुरवण्याच्या उद्देशाने उत्तर दिल्ली महानगर पालिका आणि दिल्ली पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानं ही मास्क बँक स्थापन करण्यात आल्याचं प्रकाश यांनी म्हटलं आहे. 

 थंडीच्या वातावरणात फ्लू आणि कोरोनामधील फरक 'असा' ओळखा? तज्ज्ञांनी दिली लसीबाबत महत्वाची माहिती

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, मृत्यू दरही अधिक आहे. दिल्लीतील कोरोनाबाधितांचे प्रमाण 8.49 टक्के आहे. या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याबाबतचे नियम अधिक कठोर करण्यात येत असून दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवणं हा आमचा उद्देश आहे. उत्तर दिल्लीतील प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे 104 मास्क बँका स्थापन करण्याची आमची योजना आहे. असंही या निवेदनात नमुद करण्यात आलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus latest news new delhi launched free distribution of free mask open mask bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.