घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय 

By Manali.bagul | Published: November 26, 2020 03:52 PM2020-11-26T15:52:18+5:302020-11-26T15:54:59+5:30

Health Tips in Marathi : वायू प्रदूषण आणि धुळीच्या कणांमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे फक्त बाहरेचीच नाही तर घरातील हवा सुद्धा प्रदूषित  होत आहे.

Winter Health Tips : Dust allergy causes and symptoms, prevention by experts | घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय 

घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय 

googlenewsNext

भारतात वाढत्या थंडीसोबतच प्रदूषणातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामुळे हवेची गुणवत्ता कमी होत आहे. परिणामी लोकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. हवेतील बदलांचा परिणाम त्वचा आणि फुफ्फुसांवर होत असून सर्दी, एलर्जीची समस्या अनेकांना उद्भवत आहे. या एलर्जीच्या समस्येकडे दूर्लक्ष केलं तर त्रास आणखी वाढत जाऊ शकतो. जसलोक हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरमधील कंसल्टेंट रेस्पिरेटरी मेडिसिन तज्ज्ञ डॉ. निमिष शाह यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. 

डॉ. निमिष त्यांनी वाढत्या प्रदूषणाबाबत बोलताना सांगितले की, ''वायू प्रदूषण आणि धुळीच्या कणांमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे फक्त बाहरेचीच नाही तर घरातील हवा सुद्धा प्रदूषित  होत आहे. बाहेरच्या खराब हवेमुळे आपण घरं आणि खिडक्या जास्ती जास्तवेळ बंद ठेवतो. त्यामुळे आद्रतेसोबतच  घरातील धुळीचे कण वाढतात. धुळीच्या कणांमुळे इन्फेक्शन होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात एलर्जीची समस्या वाढत जाते.''

धूळीमुळे होत असलेल्या एलर्जीचे सगळ्यात मोठे कारण डस्ट माईट्स आहेत. या सुक्ष्म कणांमध्ये मायक्रोऑर्गेनिझम्स असतात जे  डोळ्यांना दिसत नाहीत. बूरशी, फूलांतून बाहेर येत असलेले कण, पाळीव प्राण्यांच्या अंगावर असलेले केस यांमुळे एलर्जी होऊ शकते. याशिवाय अस्वच्छ खोली, बेडशिट आणि उश्यांमधून निघणारी धूळ, गॅलरी, माळा अशा ठिकाणी असलेली जळमटं या कारणांमुळे एलर्जीचा सामना कराव लागू शकतो. 

७० टक्के लोकांनी 'हा' उपाय केल्यास नियंत्रणात येईल कोरोनाचा प्रसार; संशोधनातून खुलासा

लक्षणं

एलर्जी झाल्यानंतर लोकांमध्ये  हलकी किंवा गंभीर स्वरूपाची लक्षणं पाहायला मिळतात. डॉ निमिष सांगतात की, साधारणपणे  धूळीच्या एलर्जीला ओळखण्यासाठी तीन लक्षणांना ओळखणं गरजेचं आहे. गळणारं नाक, नाकातून सतत पाणी बाहेर येणं, शिंका येणं, सर्दी, खोकला होणं, डोळे- नाक आणि घश्यात वेदना, कान बंद होणं, श्वास घ्यायला  त्रास होणं, थकवा आणि चिडचिड, डोकेदुखी, त्वचेवर खाज येणं. 

चिंताजनक! ९४ टक्के यशस्वी लसीनेही कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, मॉर्डनाच्या तज्ज्ञांचा दावा

बचावाचे उपाय

धूळीची एलर्जी असलेल्यांनी स्किन प्रिक चाचणी  (Skin Prick Test / blood test) करून घ्यायला हवी.

घरात नियमित साफसफाई करा.

आठवड्यातून दोनवेळा गरम पाण्याने बेडशीट आणि उशा धुवा.

वॅक्यूम क्लिनरचा वापर करून वस्तू नेहमी  स्वच्छ ठेवा.

सतत एलर्जी होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार करून घ्या.

एलर्जीपासून बचावासाठी वैयक्तीक वस्तूंसह घरातील फरश्या, टेबल यांची साफसफाई करा. 

Web Title: Winter Health Tips : Dust allergy causes and symptoms, prevention by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.