कोरोना व्हायरसमुळे होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.  भारतात सुद्धा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनाशी संबंधित असलेली मॅसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी यांच्या रिपोर्टनुसार  कोरोनावर आधारित अजून कोणतीही लस शोधली गेलेली नाही. पण संपूर्ण जगभरात या व्हायरसशी लढण्यासाठी  तीन पध्दतींचा प्रामुख्याने वापर केला जात आहे. चला  तर मग जाणून  कोणत्या प्रकारे तुम्ही कोरोनाला हरवू शकता.

लॉक डाऊन

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सगळ्यात जास्त प्रभावी असलेला उपाय म्हणजे लॉक डाऊन. जे सध्या भारतात करण्यात आलं आहे. या माध्यमातून व्हायरसचं संक्रमण  रोखता येऊ शकतं. हा एक प्रभावी टेस्टिंगचा उपाय  सुद्धा आहे. यामाध्यमांतून व्हायरसच्या संक्रमण होण्याला पूर्णपणे रोखता येऊ शकतं. 

संक्रमणाचा वेग कमी करणं

 कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी हा उपाय केल्यास संक्रमण पूर्णपणे थांबू शकतं. त्यातील सगळ्यात मोठा लॉक डाऊन होता. तज्ञांच्यामते लॉक डाऊनमुळे व्हायरसच्या संक्रमणाचा वेग कमी  करण्यात येईल. 

रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं

तिसरा आणि सगळयात प्रभावी उपाय म्हणजे आपली रोगप्रतिकराकशक्ती वाढवणं. व्हायरसची लागण होऊ नये असं वाटत असेल तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  चांगला आणि पौष्टीक आहार घेऊ शकता. त्यामुळे जरी तुम्हाला व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तरी त्यातून रिकव्हर होता येईल. (हे पण वाचा- माहितही नसतील, सकाळी उठल्या उठल्या शिंका येण्याची 'ही' मोठी कारणं)

कोरोनाचे  रिप्रोड्क्शन

कोरोना व्हायरसचे रिप्रोडक्शन नंबर  २ ते २.५ यामध्ये आहे. याचा अर्थ असा की इन्फेक्शनने ग्रासलेला व्यक्ती दोनपेक्षा जास्त लोकांपर्यंत इन्फेक्शन पसरवू शकतो. जर अशा स्थितीत रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर होणारा धोका टळू शकतो.  रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांनी आत्तापर्यंत कोरोनाच नाही अनेक जीवघेण्या आजारांना  हरवलं आहे.  ( हे पण वाचा-कोरोना बाधित रुग्णांवर कसे उपचार होतात माहितीये ? जाणून घ्यायचे असेल तर वाचा...)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus : How to prevent from corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.