कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता यापासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळे घरगुती उपायही करू लागले आहेत. सोशल मीडियातही कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी हजारो टिप्स व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, काही मिनिटांच्या गॅपने पाणी पित राहिल्याने कोरोनाचं संक्रमण होणं रोखलं जाऊ शकतं.

सोशल मीडियातील ओरिजनल पोस्टमध्ये म्हटले आहे की, तोंड आणि घसा नेहमीच भिजलेला ठेवा. त्यासाठी दर 15 मिनिटांनी पाणी प्यावे. याचं कारण त्यात सांगितले की, आपल्या घशातून व्हायरस साफ होईल आणि पोटात जाऊन अ‍ॅसिडने नष्ट होतील.

यावर लंडन स्कूल ऑफ हायजीन अ‍ॅन्ड ट्रॉपिकल मेडिसिनमधील एपिडेमोलॉजिस्ट कल्पना सबापॅथी यांनी बीबीसी फ्यूचरला सांगितले की, 'हे फारच सामान्यपणे सादर करण्यात आलं आहे. संक्रमण कोणत्याही एका व्हायरल कणाने नाही तर लाखो पार्टिकल्सच्या संपर्कात आल्याने होतं. त्यामुळे घशातून काही व्हायरस साफ करून काही फरक पडणार नाही. 

या थेअरीबाबत आणखी एक समस्या आहे की, यात केवळ शक्यता वर्तवली आहे की, तुम्ही सर्व व्हायरस पोटापर्यंत पोहोचवून नष्ट कराल. तोपर्यंत काही व्हायरस नाकाद्वारे पोटात शिरलेही असतील. इतरही काही मार्गांनी हे व्हायरस तुमच्या शरीरात शिरले असतील. 

कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरण्याचं मुख्य कारण तोंड नाही. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने जे थेंब बाहेर येताते श्वासाद्वारे आत घेतल्याने कोरोना व्हायरस जास्त पसरतो.

पाणी प्यायल्याने कोरोना व्हायरस दूर न होण्याचं आणखी एक कारण आहे. तुम्हाला वाटू शकतं की, हे व्हायरस पोटात गेल्यावर लगेच नष्ट होतात. कारण पोटातील आम्ल रसांची पीएच लेव्हल 1 ते 3 दरम्यान असते. पण याचा काहीही परिणाम होत नाही.

एका रिपोर्टनुसार, पाणी प्यायल्याने कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखलं जाऊ शकतं. याचा काहीही ठोस पुरावा नाही. 15-15 मिनिटांनी पाणी पिणे चुकीचे नाही. पण याने कोरोना व्हायरसला रोखता येईल अशा अफवा पसरवू नये. सद्या तुम्ही सोशल डिस्टंसिंग, हात साबणाने स्वच्छ धुणे यानेच कोरोनापासून बचाव करू शकता.


Web Title: Coronavirus : Drinking water does not kill coronavirus api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.