कोरोनासोबत जगताना विषाणूंच्या संक्रमणाला लांब ठेवण्यासाठी; 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 19:32 IST2020-05-22T19:27:00+5:302020-05-22T19:32:17+5:30
कोरोनासोबत जगत असताना संसर्ग होऊ नये यासाठी काही गोष्टी सांगणार आहोत.

कोरोनासोबत जगताना विषाणूंच्या संक्रमणाला लांब ठेवण्यासाठी; 'अशी' घ्या काळजी
(image credit- deccan herald, buisness standerd)
कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात वाढत चालला आहे. रुग्णांची आणि मृत्यू होत असलेल्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होत नाही. पण हळूहळू सर्वच देशातील लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो. भारतातही लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहेत. कारण लॉकडाऊनमुळे अनेक कामं रखडली आहेत. म्हणजेच येत्या काळात आता कोरोनासोबतच जगावं लागणार आहे असं चित्र दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनासोबत जगत असताना संसर्ग होऊ नये यासाठी काही गोष्टी सांगणार आहोत.
घरातील एखादी व्यक्ती जरी कामानिमित्त घराबाहेर जात असेल खबरदारी घेणं गरजेंच आहे. भाज्यांवरील माती आणि धुळ स्वच्छ पुसून ती काही मिनीटांसाठी खाण्याचा सोडा, अथवा मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. ज्यामुळे भाजी आणि फळे निर्जंतूक होतील.
काही दिवसांसाठी बाजारात रेडी टू कूक पद्धतीने मिळणाऱ्या भाज्यांचा किंवा स्नॅक्सचा वापर टाळा. बाजारातून आणलेल्या भाज्या आणि फळं कापण्यापूर्वी तुमचे हात काहीवेळ गरम पाण्यात साबणाने स्वच्छ धुवा. जिथे तुम्ही खायच्या वस्तू ठेवाल ती जागा देखील स्वच्छ निर्जंतुक करून घेतलेली असावी.
फळे आणि भाज्या या पाण्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा मिसळावा. या मिश्रणामध्ये धुतलेल्या भाज्या आणि फळे खाण्यासाठी संपूर्णपणे सुरक्षित होतात. फळे आणि भाज्या या मिश्रणामध्ये धुण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा मिसळावा. बाहेरून आणलेल्या कापडी पिशव्या लगेच धुवून टाकाव्यात. बाहेर जाण्यासाठी ज्या पिशवीचा वापर करता ती सतत धुतलेली आणि स्वच्छ असावी.
बाहेरून आणलेली स्टेशनरी किंवा पेपरर्स काहीवेळ बाहेर ठेवा. सॅनिटायजरचा काही गोष्टींवर परिणाम होत नाही. पेन्सिल किंवा पेनावर सॅनिटायजरचा वापर तुम्ही करू शकता. औषधं, गोळ्या घरी आणल्यानंतर काहीवेळ उन्हात ठेवा. मग पुसूनच औषधांच्या डब्ब्यात ठेवा.
माकडांवर कोरोनाच्या लसीच्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम, शास्त्रज्ञांना नवी आशा
कोरोनाला हरवण्यासाठी प्रभावी ठरू शकते 'सायटोकाइन थेरेपी'; 'या' राज्यात चाचणी सुरू