माकडांवर कोरोनाच्या लसीच्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम, शास्त्रज्ञांना नवी आशा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:14 PM2020-05-22T18:14:37+5:302020-05-22T18:27:49+5:30

कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यावर भर दिला जात आहे.

Coronavirus monkeys develop virus immunity after infection vaccine studies myb | माकडांवर कोरोनाच्या लसीच्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम, शास्त्रज्ञांना नवी आशा 

माकडांवर कोरोनाच्या लसीच्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम, शास्त्रज्ञांना नवी आशा 

Next

कोरोना व्हायरसची लस शोधण्यासाठी माकडांवर परिक्षण करण्यात आलं होतं. हे परिक्षण शास्त्रज्ञांची आशा वाढवणारं ठरलं आहे. SARS-CoV-2 च्या संपर्कात पुन्हा आल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरते का हे या संशेधनात पाहिलं गेलं. बोस्टनमधील सेंटर फॉर वायरोलॉजी एंड वॅक्सीनचे रिसर्च डायरेक्टर डॅन बॅरोच यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यावर भर दिला जात आहे.

आत्तापर्यंत व्हायरसच्या प्रसारासाठी पोषक असलेल्या घटकांवर विचार करण्यात आलेला नाही. या संशोधनात दिसून आलं की, माकडांवर प्रोटोटाईप लस कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करते. तसंच  पुन्हा कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखते. पहिल्या रिसर्चसाठी शास्त्रज्ञांनी ९ माकडांवर प्रयोग केला होता. 

या माकडांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसत होती. त्यासोबत प्रोटेक्टिव एंटीबॉडी विकसित झाल्या होत्या. त्यामुळे माकडं काही दिवसात बरी झाली. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती तपासून पुन्हा  व्हायरसच्या संपर्कात आणलं गेलं. त्यावेळी कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. त्याचप्रमाणे माणसांना सुद्धा एकदा संक्रमणातून बाहेर आल्यानंतर पुन्हा लागण झाल्यास कसा परिणाम होईल हे कळण्यासाठी वैद्यकिय अभ्यास करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

त्यानंतरच्या  संशोधनात प्रोटेक्टिव एंटीबॉडी विकसीत करण्यासाठी ३५ माकडांवर चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यांना प्रोटोटाईप वॅक्सिन देण्यात आली. त्यानंतर एका आठवड्याने त्यांना व्हायरसच्या संपर्कात आणण्यात आले. तोपर्यंत माकडाच्या शरीरात एंटीबॉडीजचा विकास झाला होता. त्यामुळे व्हायरसचा कोणताही परिणाम माकडांवर झाला नाही. 

शास्त्रज्ञांच्यामते ,या प्रयोगामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. माणसांना सुद्धा कोरोनापासून वाचवण्यासाठी हे औषध फायदेशीर ठरू शकतं. असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे.  पुढील  संशोधन एंटीबॉडीजचा परिणाम किती वेळ राहतो. हे पाहण्यासाठी केलं जाणार आहे. 

कोरोनाला हरवण्यासाठी प्रभावी ठरू शकते 'सायटोकाइन थेरेपी'; 'या' राज्यात चाचणी सुरू

घरी बसून तुम्ही जास्त गोड खाताय का? साखरेचं प्रमाण नियंत्रणात आहे की नाही 'असं' ओळखा

Web Title: Coronavirus monkeys develop virus immunity after infection vaccine studies myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.