शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

coronavirus: कोरोनाचे संक्रमण हवेतून सर्वदूर नाही, भारतीय संशोधकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 05:36 IST

कोरोनाचे विषाणू काही काळासाठी हवेमध्ये तरंगतात़ याचा अर्थ असा नाही ते सर्वत्र हवेद्वारे पसरतील आणि सर्वांना संक्रमित करतील़ त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही़

नवी दिल्ली - नुकतेच एका वैज्ञानिकांच्या गटाने कोरोनाचा संसर्ग हवेद्वारेही शक्य आहे, असे सांगितले होते़ त्याला जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) सहमती दर्शवली होती़ मात्र, भारताच्या काऊन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) मधील संशोधकांच्या मते, ताज्या संशोधनाचा असाही अर्थ होऊ शकतो की, कोरोनाचे विषाणू काही काळासाठी हवेमध्ये तरंगतात़ याचा अर्थ असा नाही ते सर्वत्र हवेद्वारे पसरतील आणि सर्वांना संक्रमित करतील़ त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही़सीएसआयर-सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा म्हणाले, की हा चांगला अभ्यास आहे़ त्या आधारे डब्ल्यूएचओला सांगितले आहे की, कोरोनाचे विषाणू काही काळासाठीच हवेमध्ये राहू शकतात़ याचा अर्थ असा की, तो पाच मायक्रॉनपेक्षा सूक्ष्म तुषारांत प्रवास करू शकतो म्हणजेच एखाद्या थेंबापेक्षा तो हवेमध्ये जास्त काळ तरंगू शकतो़मिश्रा यांनी लोकांनी सावधगिरी बाळगणे तसेच गर्दीमध्ये जाऊ नये, असे आवाहन केले आहे़ वैज्ञानिक म्हणाले, की कोणत्याही स्थितीत शारीरिक अंतर ठेवलेच पाहिजे. वातानुकूलित खोलीत (एसी)े हवेचे प्रमाण कमी असते अशा ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येण्याचे टाळले पाहिजे़ कोरोना विषाणूबद्दल फारच कमी माहिती आहे आणि त्याबद्दल पुरेशी माहिती लवकरच सांगण्यात येईल. डब्ल्यूएचओला ३२ राष्ट्रांतील २३० पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी असे लिहिले आहे की, हा विषाणू असलेले सूक्ष्म कणही हवेतून लोकांना संक्रमित करू शकतात याचा पुरावा आहे, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या अहवालात म्हटले आहे. आरोग्य संघटनेने कोरोना खोकला आणि शिंकण्याद्वारे पसरतो आणि तो हवेतून संक्रमित होणारा नाही, असे वारंवार सांगितले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत