शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; लॉकडाऊनच्या तयारीत आहेत 'हे' ३ देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 7:00 PM

CoronaVirus News & Latest Updates: आरोग्य तज्ञांचा असा अंदाज आहे की. हिवाळा आल्यानंतर कोरोना विषाणू भयानक रूप धारण करू शकतो. त्याचा परिणाम आता युरोपमध्येही दिसू लागला आहे.

जगभरात दररोज कोरोना विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण वाढत आहे. युरोपमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे पाहून ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससह युरोपमधील अनेक देश पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. जर्मनीने  रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा एका महिन्यासाठी बंद करण्याचा आदेश दिले आहेत. जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी हे निर्बंध अधिक कठोर करण्यासाठी जर्मनीच्या उच्च अधिकारीवर्गाशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर फ्रान्समध्ये दिवसाला 50 हजाराहून अधिक रुग्णसंख्येनंतर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशाला संबोधित करताना कोरोनासंदर्भात नवीन नियम व निर्बंधासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.  

डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात युरोपात कोरोनाचे प्रमाण 37 टक्के वाढले आहे.  1.3 दशलक्ष नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. असे म्हटले जात आहे की युरोपमधील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर सुरू केला आहे. ब्रिटनमध्ये एका आठवड्यात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर अनेक शहरांमध्ये कडक बंद जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने वेल्स, ग्रेटर मँचेस्टर, लिव्हरपूल सिटी, लँकशायर, साउथ यॉर्कशायर आणि स्कॉटलंड या शहरात लॉकडाऊन केलं असून या ठिकाणी  लोकांना घर सोडण्याची परवानगी नाही.

सावधान! 'ही' ५ लक्षणं असल्यास कोरोना संक्रमणानंतर उद्भवतोय 'लॉन्ग कोविड' चा धोका, रिसर्च 

आरोग्य तज्ञांचा असा अंदाज आहे की हिवाळा आल्यानंतर कोरोना विषाणू भयानक रूप धारण करू शकतो. त्याचा परिणाम आता युरोपमध्येही दिसू लागला आहे. अलीकडे युरोपमध्ये 2,05,809 नवीन कोरोना रुग्ण दिसून आले आहेत. फ्रान्समधून सर्वाधिक 45 हजार आणि ब्रिटनमध्ये 23 हजार रुग्ण समोर आले आहेत. युरोपमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये तब्बल 37 टक्के वाढ झाली आहे.

सावधान! दुचाकीवर पेट्रोल भरतेवेळी तुम्ही ही चूक करता? फुफ्फुसांवर होईल गंभीर परिणाम, कारण...

युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये दुसर्‍या कोरोना लाट लक्षात घेता नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेल्जियमने सर्व बार, हॉटेल्सना नवीन निर्बंधांचे आदेश दिले आहेत. रेस्टॉरंट्स सोमवारपासून जवळपास एक महिना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर इटलीने लोकांना घराबाहेर पडण्यासाठी मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत. सहा वाजल्यानंतर येथे बार आणि रेस्टॉरंट बंद होतील .फ्रान्समध्ये सकाळी 9 ते सकाळी 6 या वेळेत 9 मोठ्या शहरांमध्ये कर्फ्यू आहे. अनावश्यक कारणासाठी बाहेर जाण्यासाठी दंड देखील भरावा लागू शकतो. जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले. त्याच वेळी ब्रिटनमधील बर्‍याच शहरांमध्ये कडक लॉकडाउन करण्यात आलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यGermanyजर्मनीFranceफ्रान्स