सावधान! आता नखं वाढवण्याची सवय पडेल माहागात; होऊ शकते कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 16:06 IST2020-06-18T16:04:17+5:302020-06-18T16:06:21+5:30

स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास चांगलच माहागात पडू शकतं.

Coronavirus can also be caused by nails so be careful | सावधान! आता नखं वाढवण्याची सवय पडेल माहागात; होऊ शकते कोरोनाची लागण

सावधान! आता नखं वाढवण्याची सवय पडेल माहागात; होऊ शकते कोरोनाची लागण

अनेक स्त्रियांना तर काही प्रमाणात पुरूषांनाही नखं वाढवायला आवडतात. खरंतर  लहानपणापासूनच सगळ्यांना नखं वाढली की लगेच कापून टाकावी असं शिकवलं जातं. कारण नखं जास्त वाढल्यास विषारी ठरू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे किटाणू आणि घाण नखांमध्ये साचल्याने आजारांचा सामना करावा लागू शकतो.

तरीही काही लोक नखं वाढवतात. स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास चांगलच माहागात पडू शकतं. तुमचा विश्वास बसणार नाही पण नखांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे तुम्हाला कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो. 

कोरोनाशी लढण्यासाठी आत्तापर्यंत कोणतीही लस किंवा औषध तयार करण्यात आलेलं नाही. त्यामुळे रोगप्रतिराकशक्ती चांगली ठेवूनच आपल्याला रोगाशी लढायचं आहे.  डॉक्टरांकडून लोकांना नखं वेळोवेळी कापण्याचं आवाहन केलं जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त लांब नखं असतील तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. नखांमध्ये अडकलेली घाण नकळतपणे रोगांना निमंत्रण देऊ शकते. म्हणून नखांची स्वच्छता ठेवायला हवी.

लहान मुलांनाही तोंडात बोट घालून नखं चावायची सवय असते. जर तुमच्याघरी लहान मुलं असतील तर या बारिकसारिक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोरोनाची लस येईपर्यंत नखं वाढवण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो. अनेक संशोधनातून दिसून आलं आहे की,  नखांद्वारे घाण पोटात गेल्यामुळे लहान मुलांना उलटी जुलाब अशा समस्या उद्भवतात म्हणून आरोग्याला जपण्यासाठी या सवयीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

'या' देशात कोरोनाची लस तयार, ह्युमन ट्रायलला सुरूवात

खुशखबर! कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी या महिन्याच्या अखेरीस औषध उपलब्ध होणार, जाणून घ्या औषधाबाबत

Web Title: Coronavirus can also be caused by nails so be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.