CoronaVirus : America fda approves remdesivir as first drug to treatment of covid-19 | आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावा

आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावा

कोरोना व्हायरसने  संपूर्ण जगभरातील देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसची लस कधी उपलब्ध होणार यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर करून कोरोना रुग्णांचा जीव वाचवला जात होता. आता कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या सध्या वेगवेगळ्या औषधांवर चाचणी सुरू आहे.  दरम्यान कोरोनाच्या पहिल्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. उपचारांसाठी रेमडेसिवीर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाणार आहे. 

कॅलिफोर्नियातील गिलियड सायन्सेज  कंपनीने या औषधाची निर्मीती केली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांवर  आपातकालीन स्थितीत उपचार करण्यासाठी या औषधाला मान्यता देण्यात आली होती. आता अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषधाला उपचारासाठी मंजुरी दिली आहे. अमेरिकेतील प्रमुख आयोग्यसंस्था FDA ने मान्यता दिलेलं हे पहिलंच औषध आहे. 

कोरोनाच्या उपचारांत रेमडेसिविर कितपत प्रभावी, WHO च्या तज्ज्ञांनी सांगितलं

अमेरिकन औषधनिर्माता कंपनी गिलिएड सायन्सच्या रेमडेसिवीर औषधाचा वापर भारतात केला जात होता.  तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करण्यासाठी याच औषधाचा वापर केला गेला होता.  हे एंटी व्हायरल ड्रग असून  जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेरिविरच्या उपयुक्ततेबाबत सांगितले होते की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये रेमडेसिवीर कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात फारसे परिणामकारक दिसून आले नाही. या औषधामुळे रुग्णाच्या संसर्गाचे दिवसही कमी झाल्याचे दिसले नाही. दरम्यान, गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यात हे औषध परिणामकारक ठरले नाही. दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी

या संशोधनादरम्यान, ३० देशांमधील ११ हजारांहून अधिक वयस्कर रुग्णांवर या औषधांच्या दिसून आलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये ही औषधे बाधित रुग्णांवरील उपचारात कुठलेही सकारात्मक परिणाम देत नसल्याचे, तसेच मृत्युदरामध्येही फारसा फरक पाडत नसल्याचे समोर आले होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले होते की, या संशोधनामध्ये औषधांचा कुठलाही परिणाम दिसून न आल्यानंतर हायड्रोक्सिक्लोरोक्विन, अँटी एचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनाविर-रिटोनाविर यांच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले होते. या संशोधनाबाबतची माहिती लवकरच कुठल्यातरी मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे, त्यानंतर या संधोधनाला अधिकृतरीत्या मान्यता मिळेल. चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : America fda approves remdesivir as first drug to treatment of covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.