चीनमध्ये कहर माजवणारा कोरोनाचा व्हेरिएंट भारतात, ओमायक्रॉन BF.7 ची आढळली 3 प्रकरणे  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 05:42 PM2022-12-21T17:42:17+5:302022-12-21T17:43:08+5:30

omicron sub variant : बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण वाढ झालेली नसली तरी सध्याच्या आणि नवीन व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सतत देखरेख ठेवण्याची गरज आहे.

coronavirus alert 3 cases of omicron sub variant bf 7 driving-china-covid-surge-detected-in-india-5089219.html hi karato | चीनमध्ये कहर माजवणारा कोरोनाचा व्हेरिएंट भारतात, ओमायक्रॉन BF.7 ची आढळली 3 प्रकरणे  

चीनमध्ये कहर माजवणारा कोरोनाचा व्हेरिएंट भारतात, ओमायक्रॉन BF.7 ची आढळली 3 प्रकरणे  

googlenewsNext

नवी दिल्ली : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार माजला आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना वाढत्या रुग्णसंख्येसाठी जबाबदार असलेल्या ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंट BF.7 ची तीन प्रकरणे भारतातही समोर आली आहेत. यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी बुधवारी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतात गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने BF.7 चे पहिले प्रकरण शोधले होते. गुजरातमध्ये आतापर्यंत दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर ओडिशातून एक प्रकरण नोंदवले गेले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण वाढ झालेली नसली तरी सध्याच्या आणि नवीन व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सतत देखरेख ठेवण्याची गरज आहे. दरम्यान, येथील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील विविध शहरे सध्या ओमायक्रॉनच्या विळख्यात आहेत. हा कोरोनाचा अत्यंत संसर्गजन्य व्हेरिएंट आहे. 

मुख्यतः चीनच्या बीजिंगमध्ये पसरणारा ओमायक्रॉन BF.7 आहे. त्यामुळे चीनमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी झेप घेतली आहे. BF.7 हा ओमायक्रॉनचा BA.5 चा सब व्हेरिएंट आहे आणि यामध्ये व्यापक संसर्ग, कमी उष्मायन कालावधी आणि लसीकरण झालेल्या लोकांना पुन्हा संसर्ग होण्याची किंवा संसर्ग होण्याची उच्च क्षमता आहे. हा आधीच अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या अनेक देशांमध्ये आढळला आहे.

दरम्यान, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेमध्ये  कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत असताना केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना संसर्गाच्या नवीन व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी संक्रमित नमुन्यांची संपूर्ण जीनोम सीक्वेन्स तयार करण्याचे आवाहन केले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, अशा प्रकारच्या सरावामुळे देशातील नवीन व्हेरिएंट वेळेवर शोधण्यात मदत होईल आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाय सुलभ होतील.

Web Title: coronavirus alert 3 cases of omicron sub variant bf 7 driving-china-covid-surge-detected-in-india-5089219.html hi karato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.