(image credit- healthline)

जोपर्यंत कोविड १९ ची लस येत नाही तोपर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत कोरोना व्हायरसची लस येत नाही तोपर्यंत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणणं कठीण आहे. सामान्य लक्षणं दिसत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. भारतात अनेक  कंपन्यांनी कोरोनाचे औषध लॉन्च केले आहे.  त्यासाठी या कंपन्यांना DCGA कडून परवागनी मिळाली आहे. 

NBT

Glenmark Pharmaceuticals  कंपनीने कोरोनाच्या उपचारात वापरात असलेली फेबीफ्लू या औषधांच्या किमतीत २७ टक्क्यांनी कमी केली आहे. आधी या टॅबलेटची किंमत १०३ रुपये इतकी होती. त्यानंतर किंमत कमी करून ७५ रुपये ठेवण्यात आली. माइल्ड ऐंड मॉडरेट कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर केला जात आहे. 

NBT

गेल्या काही दिवसात बायोकॉनचे औषध Itolizumab ला  कोरोनाच्या उपचारांसाठी परवागनी मिळाली आहे. याचा वापर मॉडरेट टू सीवियर कोरोना रुग्णांवर केला जातो. या इंजेक्शनच्या कोर्सची किंमत ३२ हजार रुपये इतकी आहे. तर एका इंजेक्शनची किंमत ८ हजार रुपये इतकी आहे. या औषधांच्या वापराला जगभरातून मंजूरी मिळाली आहे. 

NBT

जून महिन्यात सीपला कंपनीने रेमडीसीवीरचे जेनेरिक वर्जन सिप्रेमी हे औषध लॉन्च केले. त्यासाठी  DCGA कडून मान्यता मिळाली आहे. आपातकालीन स्थितीत या औषधाच्या वापरासाठी परवागनी देण्यात आली आहे. हे एक प्रकारचे इंजेक्शन आहे. या औषधांची प्रती वायल ४००० रुपये इतकी आहे. 

NBT

कोरोना काळात Tocilizumab या औषधांला जबरदस्त मागणी आहे. मुंबईसारख्या भागात या औषधांचा वापर  मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. बाजारात या औषधाचा काळाबाजार वाढल्याने या औषधांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 

NBT

Hetero Pharma ने रेमडेसिवीरचे जेनेरिक औषध लॉन्च केले आहे. या औषधाचे नाव कोविफॉर आहे. या औषधाची किंमत प्रति ५,४०० रुपये इतकी आहे. रूग्णालयात भरती असलेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर केला जातो. 

NBT

Mylan NV ने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार गिलिड सायंजेसने रेमडीसीवरचे जेनेरिक वर्जन लॉन्च करण्यासाठी  करार केला आहे. या औषधाच्या वापरासाठी DGCI कडून परवानगी मिळाली आहे. १०० mg/vial ची किंमत ४,८०० इतकी असेल. 

खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाखांवर; पण 'या' ९ गोष्टी दिलासादायक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : 6 medicines used for coronavirus treatment in india know its price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.