CoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:00 PM2020-04-08T17:00:57+5:302020-04-08T17:05:32+5:30

गरमीच्या वातावरणात शरीरातून खूप घाम निघत असतो. त्यातून अनेक टॉक्सिन्स, बॅक्टेरिया बाहेर पडत असतात. बॅक्टेरियांमुळे शरीरााला घाम येत असतो. त्यामुळे त्वचा रोग होण्याची शक्यता असते.

CoronaVirus: 5 rules of perso nal hygiene you should follow to prevent virus bacteria and other diseases myb | CoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी

CoronaVirus : कोरोना आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी

Next

सध्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या जगभरासह भारतात सुद्धा वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण होत असलेल्या लोकांची संख्या  वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा सवयी  सांगणार आहोत. ज्यात बदल घडून आणल्यानंतर तुम्ही कोरोनापासून लांब राहू शकता.


 हात सॅनिटाईज ठेवा

सॅनिटाईजर सध्याच्या परिस्थीत जीवनावश्यक वस्तूंपैकी एक बनली आहे. पण सॅनिटायजरचा वापर लोकांनी खूप आधीपासूनच केला असता तर ही वेळ आलीच नसती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कुटुंबाची काळजी घेणं आत्ताच्या घडीला गरजेचं असल्यामुळे बाहेर पडणं टाळा.  सरकारने एटीएम बंद केलेले नाहीत. एटीएममध्ये अनेक लोकांचा वावर असतो. त्यामळे हाताला सॅनिटाईज करूनचं एटीएममध्ये प्रवेश करा. तसंच घरातील कोणत्याही वस्तूला  हात लावताना सॅनिटाईज करून घ्या.

डिओचा वापर करा

गरमीच्या वातावरणात शरीरातून खूप घाम निघत असतो. त्यातून अनेक टॉक्सिन्स, बॅक्टेरिया बाहेर पडत असतात. बॅक्टेरियांमुळे शरीरााला घाम येत असतो. त्यामुळे त्वचा रोग होण्याची शक्यता असते. त्यासाठी डिओचा वापर करा. यामुळे डीओत असलेले अल्कोहोल बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात.

कपड्यांची स्वच्छता 

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी स्वतःचे कपडे रोज स्वतः धुवा.  कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्याच कपड्यांवर घरात इतर ठिकाणी फिरू नका, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. अंर्तवस्त्रे सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ करा.

प्रायव्हेट पार्टस स्वच्छ ठेवा

प्रायव्हडे पार्ट्सकडे दुर्लक्ष करू नका. त्या भागातील केसांची वाढ झाली असेल तर घरगुती उपायांचा वापर करून तो भाग स्वच्छ ठेवा. कारण उन्हाळा सुरू झाल्यामुळे शरीरातील उष्णता वाढून खाज, खुजली, फंगल इन्फेक्शचा सामना करावा लागू शकतो. यासाठी आधीच स्वच्छता बागळा. महिलांनी सुद्धा मासिक पाळी दरम्यान सतत पॅड बदलून तो भाग स्वच्छ ठेवा. अन्यता सेक्शुअसी ट्रान्समिडेट डिसीज पसरण्याची शक्यता असते. दिवसातून कमीतकमी दोन वेळा अंघोळ करा.

Web Title: CoronaVirus: 5 rules of perso nal hygiene you should follow to prevent virus bacteria and other diseases myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.