CoronaVaccine News : ऑक्सफोर्ड लसीबाबत तज्ज्ञांचा खुलासा; लसीकरणानंतर या वयोगटातील लोकांना साईड इफेक्ट्सचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 04:14 PM2021-04-09T16:14:46+5:302021-04-09T16:28:08+5:30

CoronaVaccine News : यावेळी फक्त सुरक्षेच्या कारणास्तव तरूणांना ही लस देण्यात येऊ नये, असं सांगितलं जात आहे.

CoronaVaccine News : Dont give oxford astrazeneca vaccine to under 30 in brittain expert suggest | CoronaVaccine News : ऑक्सफोर्ड लसीबाबत तज्ज्ञांचा खुलासा; लसीकरणानंतर या वयोगटातील लोकांना साईड इफेक्ट्सचा धोका

CoronaVaccine News : ऑक्सफोर्ड लसीबाबत तज्ज्ञांचा खुलासा; लसीकरणानंतर या वयोगटातील लोकांना साईड इफेक्ट्सचा धोका

Next

ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनेकाद्वारे विकसित करण्यात आलेली कोरोनाची लस जगभरातील टॉप लिडिंग लसीच्या डोसपैकी एक आहे. दरम्यान ही लस  घेतल्यानंतर तरूणांना सगळ्यात जास्त धोका आहे. अशी माहिती समोर येत आहे. वॅक्सिननेशन आणि इम्यूनायजेशनसाठी तयार करण्यात आलेल्या ब्रिटनच्या ज्वाॉइंट कमिटीनं बुधवारी सांगितले ब्लड क्लॉट्सची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत.  म्हणून  ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लस न देणं फायद्याचं ठरेल. 

JCVIचे वेइसेन शेन यांनी सांगितले की, ''उपलब्ध माहिती आणि पुराव्यांच्या आधारे कमीटीनं ही सिफारिश केली आहे ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना ही लस देण्यापेक्षा दुसरी लस द्यायला हवी. तरूणांमध्ये हॉस्पिस्टलायजेशनचा धोका  कमी होता. लसीचा एक डोस घेतल्यानंतर धोका वाढला.''  यावेळी फक्त सुरक्षेच्या कारणास्तव तरूणांना ही लस देण्यात येऊ नये, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान ज्यांनी या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोससुद्धा घ्यायला हवा. लसीकरणाच्या सुरूवातीला तज्ज्ञांनी लसीचे दोन वेगवेगळे शॉट्स घेऊ नये याबाबत सांगितले होते. ब्रिटनमधील MHRA मेडिसिन रेगुलेटरनं ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनेकाद्वारे विकसित लसीच्या शॉट्सचे साईड इफेक्ट्स समोर आणल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. ब्रिटनं आणि युरोपमधील मेडिसिन  रेग्यूलेटर्सनी या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे मान्य केलेले नाही. 

लस घेतल्यानंतरही काही गोष्टींची काळजी  घेणं आश्यक आहे

लस घेतल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात करू नका. २ ते ३ दिवस आराम करा. लस घेतल्यानंतर २४ तासांनी साईड इफेक्ट्स दिसायला सुरूवात होते. म्हणून लस घेतल्यानंतर कमीतकमी दोन ते तीन दिवस आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. 

जर तुम्ही सध्या लसीचा पहिला डोस घेतला असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. जोपर्यंत लसीचा दुसरा डोस मिळत नाही, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.

कोरोनाचं संक्रमण पुन्हा एकदा वेगानं पसरत आहे. त्यामुळे तुम्ही जरी लस घेतली असेल तरीसुद्धा प्रवास करणं टाळा. अमेरिकेतील सेंटर फॉर डीजीज कंट्रोल ऑफ प्रिवेंशनने दिलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर प्रवास करणं टाळायला हवं. 

साध्या वाटणाऱ्या 'या' ७ लक्षणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो हृदयाचा गंभीर आजार; वेळीच सावध व्हा

जर तुम्ही दारू किंवा सिगारेट पीत असाल तर लसीकरणानंतर यापासून लांब राहा. कारण लसीकरणानंतर कमीत कमी तीन महिने तुम्ही मद्यपान, धुम्रपान टाळायला हवं. याशिवाय तळलेले पदार्थ खाण्यापासून लांब राहा. 

जर तुम्हाला कोणतीही एलर्जीक समस्या असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण लस घेतल्यानंतर अनेकदा साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. अशावेळी घाबरून  न जाता तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

नवीन टुथब्रश घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, तरच पांढरेशुभ्र राहतील दात, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

लस घेतल्यानंतर मास्क लावायची गरज नाही हा विचार चुकीचा आहे.  लसीचे दोन डोस घेतल्यानंतरच शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला कोरोना संक्रमणाचं शिकार बनवू शकतो.
लस घेतल्यानंतर आणि आधी स्वतःला हायड्रेड ठेवणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्या आहारात जास्तीत जास्त पाणी, फळं आणि भाज्यांचा समावेश करा.  त्यामुळे शरीर आतून चांगलं राहण्यास मदत होईल. 
 

Web Title: CoronaVaccine News : Dont give oxford astrazeneca vaccine to under 30 in brittain expert suggest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.