खुशखबर! आता तुम्ही घरबसल्या होणार कोरोनामुक्त; केवळ एका गोळीनं 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 02:32 PM2021-04-30T14:32:51+5:302021-04-30T14:47:55+5:30

Coronavirus : सध्या या औषधाचं नाव PF-07321332 असं देण्यात आलं आहे. या औषधाची सध्या क्लीनिकल ट्रायल सुरू आहे.

Corona will be treated even while staying at home that too with just one pill, know how? | खुशखबर! आता तुम्ही घरबसल्या होणार कोरोनामुक्त; केवळ एका गोळीनं 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' शक्य

खुशखबर! आता तुम्ही घरबसल्या होणार कोरोनामुक्त; केवळ एका गोळीनं 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' शक्य

Next

कोरोनातून (Coronavirus) लोक बरे होणार तेही घरी राहून आणि केवळ एक गोळी घेऊन...होय हे शक्य आहे. कोविडपासून बचावासाठी लस तयार करणारी कंपनी फायजर (pfizer) ने आता संक्रमित लोकांच्या उपचारासाठी औषधही तयार केलं आहे. त्यांनी केवळ एका गोळीने उपचार होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, याचा फायदा भविष्यात होणार आहे. सध्या या औषधाचं नाव PF-07321332 असं देण्यात आलं आहे. या औषधाची सध्या क्लीनिकल ट्रायल सुरू आहे आणि जर हे ट्रायल यशस्वी झालं तर घरीच लोक बरे होतील. त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, सध्या या औषधाची फेज १ ट्रायल अमेरिका आणि बेल्जिअममध्ये सुरू आहे. ट्रायलमध्ये १८ ते ६० वयोगटातील ६० लोकांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत या औषधाचं ट्रायल प्राण्यांवर झालं आहे. ज्यातून कोणत्याही प्रकारची रिस्क समोर आली नसल्याचा कंपनीने दावा केलाय.

कसं करेल काम?

मीडिया रिपोर्टनुसार, हे औषध एचआयव्हीच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या अॅन्टी रेट्रोव्हायरल औषधासारखं आहे. याप्रकारचं औषध शरीरात व्हायरचं प्रमाण इतकं कमी करते की, त्याला ओळखंलही जाणार नाही. याने व्हायरस वाढू शकत नाही आणि इतर लक्षणांवर उपचार घेऊन रूग्ण बरा होतो. हे औषध प्रोटीज इनहिबिटर टेक्निकने तयार केलं आहे. ज्यात औषध व्हायरल एंजाइमवर प्रभाव करतं आणि व्हायरस कोशिकांमध्ये आपली कॉपी बनवू शकत नाही. एचआयशिवाय हेपेटायटिस सी व्हायरस विरोधातही अशाप्रकारच्या टेक्नीकने औषध बनवलं आहे. (हे पण वाचा : CoronaVaccine : तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव)

कमी लोकांवर ट्रायल का?

फायजरचं म्हणणं आहे की, या औषधाने SARS-CoV-2 शिवाय इतर कोरोना व्हायरसवरही प्रभाव आढळून आला. अशात भविष्यात जर कोरोना व्हायरसचं नवं रूप आलं तर त्यावरही हे औषध प्रभावी ठरेल. कंपनीने सांगितलं की, पहिल्या टप्प्यात मोजक्याच निरोगी लोकांवर या औषधाचं ट्रायल केली जात आहे. कारण आता हे बघायचं आहे की, मानवी शरीर हे औषध किती सहन करू शकतं. जर सगळं काही बरोबर झालं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जास्त लोकांवर ट्रायल केली जाईल. सध्या औषधावर रिसर्च सुरू आहे. अशात हे सांगणं अवघड होईल की, हे औषध बाजारात कधी येईल.

इंजेक्शनच्या डोजचं ट्रायल

तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गोळी सोबत फायजर इंजेक्शन द्वारे दिल्या जाणाऱ्या डोजचीही ट्रायल करत आहे. याला PF- 07304814 असं नाव देण्यात आलं आहे. याची सध्या फेज १-बी मल्टी डोज ट्रायल सुरू आहे. हे सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोना संक्रमित रूग्णांना दिलं जात आहे. (हे पण वाचा : CoronaVaccine : संक्रमण होतंच मग कोरोनाची लस का घ्यायची? तज्ज्ञांनी सांगितला लस घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा)

फायजरचे चीफ साइंटिफिक ऑफिसर मायकल डॉलस्टन म्हणाले की, हे औषध तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गोळीच्या रूपात बनवलं जात आहे कारण संक्रमित व्यक्तीला पहिलं लक्षण दिसताच व्यक्तीला देता यावी. याने रूग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे किंवा आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज राहणार नाही.
 

Web Title: Corona will be treated even while staying at home that too with just one pill, know how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.