Corona virus mutations down to chance in more ways than one | अरे देवा! एकापेक्षा जास्त रूप बदलून अधिक घातक होत आहे कोरोना व्हायरस, रिसर्चमधून खुलासा....

अरे देवा! एकापेक्षा जास्त रूप बदलून अधिक घातक होत आहे कोरोना व्हायरस, रिसर्चमधून खुलासा....

कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने अनेक देशातील सरकारांना आणि वैज्ञानिकांना चिंतेत टाकलं आहे. अनेक वैज्ञानिक आणि मेडिकल इन्स्टिट्यूट यावर रिसर्च करत आहेत की, व्हायरस कसा आणि का अधिक जास्त संक्रामक झाला आहे. सर्वच व्हायरसप्रमाणे SARS-CoV-2 सुद्धा आपलं अस्तित्व टिकूवन ठेवण्यासाठी सतत स्वत:ला बदलत आहे. आतापर्यंत रिसर्चमधून समोर आलं आहे की, या व्हायरसची जी जेनेटिक कोडिंग केली गेली आहे त्यात काहीतरी कमतरता राहिली आहे. 

जेनेटिक कोडिंगमध्ये ही कमतरता ब्रिटन दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये नुकताच समोर आलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमध्ये आढळून आली आहे. ज्यामुळे त्याला अधिक संक्रामक बनण्यास मदत मिळत आहे.
बर्न यूनिव्हर्सिटीचे महामारी वैज्ञानिक एम्मा होडक्रॉफ्ट म्हणाले की, 'जेव्हा आपण संक्रमणाच्या अधिक केसेस बघतो तेव्हा आपण या परिस्थितीत येण्यासाठी व्हायरसला संधी अधिक मिळवून देत असतो. ते म्हणाले की, जेवढ्या जास्त केसेस तेवढं जास्त संक्रमण पसरवण्यासाठी या व्हायरसला संधी मिळते. ही परिस्थिती त्याला स्वत:त बदल करून संक्रमणाचा वेग वाढवण्याची संधी देते. जर आपण केसची संख्या कमी ठेवली तर आपण अनिवार्य रूपाने व्हायरसला सीमित क्षेत्रात ठेवू शकतो'.

लंडनच्या इंपेरिअल कॉलेजचे एक वायरोलॉजिस्ट वेंड बार्कले म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या नवी स्ट्रेन अनेक कारणांचा परिणाम होता. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, जसे तुम्ही फासा फेकता आणि तेव्हा प्रत्येकवेळी वेगळा नंबर येतो. पण फासा एकच असतो त्याचप्रमाणे 'या व्हायरसचे वेगवेगळे रूप आहेत पण संयोजन एकच आहे. व्हायरस वर्तमानात ज्या वातावरणात आहे. त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन तो नवं रूप धारण करतो.

ते म्हणाले की कोरोना व्हायरस पसरल्यावर एक वर्षानंतर नवा स्ट्रेन येणं अपेक्षित नव्हतं. कारण लसीकरण आणि नैसर्गिक संक्रमणाच्या माध्यमातून वैश्विक प्रतिरक्षा स्तर वाढला आहे. मात्र, कोरोना व्हायरस सामान्यपणे शरीरात बेअसर होण्याआधी जवळपास १० दिवसांसाठी लोकांना संक्रमित करतो. रिसर्चमधून समोर आलं आहे की काही रूग्णांच्या शरीरात तो अधिक काळासाठी राहतो. ज्यामुळे त्याला स्वत:त बदल करण्यासाठी वेळ आणि सधी दोन्ही मिळतात.

एक दुसरे तज्ज्ञ मेअर म्हणाले की, ज्या संक्रमित व्यक्तीवर उपचार केले जातात त्यांच्या शरीरात व्हायरसवर काही प्रमाणात रोगप्रतिकारकशक्तीचा दबाव राहतो. ज्यामुळे व्हायरस आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी स्वत:त बदल करण्यासाठी धडपडत असतो. ते म्हणाले की, महामारी दरम्यान एक अधिक संक्रमणीय स्ट्रेन विकसित होण्याची शक्यता होती. कारण सुरूवातील जे लोक संक्रमित झाले होते त्याच्या शरीरात व्हायरसला रोखण्यासाठी प्रतिरक्षेचे उपाय केले गेले होते. त्यामुळे त्या व्यक्तींच्या शरीरातील व्हायरसने आपलं रूप बदललं.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus mutations down to chance in more ways than one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.