Corona virus : खरंच गरमीमुळे कोरोनाचा धोका कमी होईल? जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 10:05 AM2020-03-15T10:05:35+5:302020-03-15T10:07:27+5:30

गरमी आल्यामुळे खरचं  कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.

Corona virus : Fact check corona virus is rising temperatures can stop the infection | Corona virus : खरंच गरमीमुळे कोरोनाचा धोका कमी होईल? जाणून घ्या....

Corona virus : खरंच गरमीमुळे कोरोनाचा धोका कमी होईल? जाणून घ्या....

Next

सोशल मीडियावर कोरोना व्हायरसशी निगडीत अनेक चर्चा सुरू आहेत. गरमीचं वातावरण  झाल्यानंतर किंवा तापमानात वाढ झाल्यानंतर कोरोना व्हायरस कमी  नष्ट होईल.  उन्हाळ्याच्या  दिवसात कोरोना व्हायरसचा धोका उद्भवणार नाही.  अशा चर्चा लोकांमध्ये रंगल्या आहेत.पण तज्ञांच्यामते या  गरमी आल्यामुळे खरचं  कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.

 
तज्ञांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की गरमीचं वातावरण तयार झाल्यानंतर व्हायरस निष्क्रिय होतात. पण याचा योग्य परीणाम होण्यासाठी तापमान ३८ ते ४० डिग्री किंवा यापेक्षा जास्त असायला हवं. अनेकदा व्हायरस नष्ट न होता त्याच्या स्वरूपात बदल सुद्धा घडून येत असेल. त्यामुळे कोरोना व्हायरसचं स्वरूप कशाप्रकारे बदलू शकतं. यावर अजून रिसर्च करण्यात आलेला नाही. 

सामान्यपणे कोणताही व्हायरस सामान्य तापमानात खूप सक्रिय असतात. खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड वातावरणात   व्हायरस हा सुस्त पडत असतो. तापमान वाढल्यानंतर ते स्वतःला झाकून घेतात. आणि निष्क्रिय होतात. याऊलट जर अनुकूल वातावरण त्यांना मिळालं तर सक्रिय होतात  आणि आपली संख्या वाढवतात.   असा  अनेकांचा समज आहे. ( हे पण वाचा- Corona virus : ऑनलाईन शॉपिंग, नको रे बाबा! त्यामुळे होऊ शकतो कोरोना...)

थायलंडमध्ये आणि सिंगापूरमध्ये १५ दिवसांत तापमान  कमाल २६ ते २७ डिग्री ते ३७  डिग्रीपर्यंत होते.  असं असताना सुद्धा त्या ठिकाणी कोरोनाटचे रुग्ण आढळले. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात  आलेल्या माहितीनुसार  कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण समोर आले. आता ही संख्या ७० वर पोहोचली आहे. ( हे पण वाचा-रोगप्रतिकारकशक्ती वाढवून इन्फेक्शनला दूर ठेवेल लसणाची चविष्ट चटणी....)

Web Title: Corona virus : Fact check corona virus is rising temperatures can stop the infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.